हुमणी, भुंगेरेचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:08 AM2021-06-05T04:08:16+5:302021-06-05T04:08:16+5:30
खोडद : सध्या शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक संकटाशी सामना करावा लागतोय. अस्मानी संकटांचा भार तर शेतकऱ्यांवर वर्षभर असतोच; पण रोग, ...
खोडद : सध्या शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक संकटाशी सामना करावा लागतोय. अस्मानी संकटांचा भार तर शेतकऱ्यांवर वर्षभर असतोच; पण रोग, कीड, कीटक, बुरशीजन्य रोग यांसारख्या अनेक समस्यांमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. सध्या पिकांवर हुमणी, भुंगेरेचा प्रादुर्भाव वाढला असून, हुमणी, भुंगेरेचा व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा, असे आवाहन नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे यांनी केले.
नारायणगाव ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र यांच्यामार्फत एकात्मिक कीड व्यवस्थापनविषयीचे एकदिवसीय शेतकरी प्रशिक्षण रामवाडी, मंगरूळ, पारगाव येथे आयोजित केले होते. त्यावेळी ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे बोलत होते. या वेळी गावातील प्रगतिशील शेतकरी बाबाजी डेरे, दत्तात्रय येवले, बाजीराव डेरे, सुखदेव येवले, गणेश भोर, प्रभू ढोमे, शंकर भोर व गोरक्ष तहु व इतर ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
डॉ. गावडे म्हणाले की, वळवाचा पहिला पाऊस चांगला झाल्यास सुप्तावस्थेत असलेले भुंगेरे सूर्यास्तानंतर बाभूळ, कडूनिंब, बोर, चिंच, पिंपळ, शेवगा, गुलमोहर इत्यादी झाडांवरील पाने खाऊन ते जगतात. हे भुंगेरे पावसाळी किंवा ढगाळ वातावरणामध्ये संध्याकाळी सूर्यास्तानंतर बाहेर पडतात. या वेळेस जर आपण या किडीचे भुंगेरे जमा करून मारले तर आपल्या पिकाचे नुकसान टाळू शकतो यासाठी प्रकाश सापळे तसेच सौरऊर्जावरील सापळेच्या वापर करून आपण त्या किडीचा बंदोबस्त करता येऊ शकतो.
यासाठी कृषी विज्ञान केंद्रामार्फत सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी सौरऊर्जावरील सापळ्याचे प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आले. दत्तात्रय येवले यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रगतिशील शेतकरी शंकर भोर यांनी मानले.
०४ खाेडद
हुमणी, भुंगेरेचे व्यवस्थापन करण्यासाठी तयार केलेला प्रकाश सापळे.