दुर्मिळ छायाचित्रांमधून गांधीजींच्या कार्याला उजाळा, ४०० चित्रांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 02:27 AM2018-10-02T02:27:49+5:302018-10-02T02:28:18+5:30
बालगंधर्व कलादालनात प्रदर्शन : ७ आॅक्टोबरपर्यंत प्रदर्शन पाहता येणार
पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावरील दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात महात्मा गांधी यांच्या जीवनावरील सुमारे ४०० दुर्मिळ छायाचित्र आहेत. गांधीजींच्या जीवनातील अनेक प्रसंगांना या छायाचित्रांमधून उजाळा मिळत आहे.
प्रदर्शनचे उद्घाटन कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभय छाजेड यांनी केले. नितीन शस्त्री यांनी ही दुर्मिळ छायाचित्रे एकत्र केली आहेत. गांधीजींच्या अनेक छायाचित्रांची माहिती व संदर्भ नितीन शस्त्री यांनी अभय छाजेड यांना दिली. महात्मा गांधी यांच्या जीवनावरील छायाचित्र पाहून छाजेड यांनी
नितीन शस्त्री यांचे स्वागत केले. ते म्हणाले, ‘या प्रदर्शनामुळे गांधीजी यांचे दुर्मिळ छायाचित्र लोकांना पाहावयास मिळतील; तसेच त्यांचा खरा इतिहासही लोकांपर्यंत पोहोचेल. प्रदर्शनास जामुवंत मनोहर, दुर्गा शुक्रे, आशिष जेम्स, अविनाश माने, अतुल नंदा यांचे विशेष सहकार्य लाभले.
७ आॅक्टोबरपर्यंत प्रदर्शन पाहता येणार
च्हे प्रदर्शन दिनांक १ ते ३ आॅक्टोबरदरम्यान ‘कला दालन’, बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी १० ते सायंकाळी ८ पर्यंत, तर दिनांक ४ ते ७ आॅक्टोबरदरम्यान गांधीभवन, कोथरूड येथे सकाळी १० ते सायंकाळी ८ पर्यंत सर्वांसाठी खुले राहील. ‘गांधीजींच्या जवळपास ४५० दुर्मिळ छायाचित्रांतून महत्त्वाच्या काही छायाचित्रांची निवड नितीन शस्त्री
यांनी केली.