51 हजार दिव्यांनी उजळून निघाला शनिवारवाडा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2018 08:06 PM2018-11-04T20:06:55+5:302018-11-04T20:17:20+5:30

चैतन्य हास्ययाेग मंडळातर्फे शनिवारवाड्याच्या प्रांगणात 51 हजार दिव्यांची अारास करुन दिवाळीचा पहिला दिवस साजरा करण्यात अाला.

lightning of shaniwar wada by 51 thousand divas | 51 हजार दिव्यांनी उजळून निघाला शनिवारवाडा

51 हजार दिव्यांनी उजळून निघाला शनिवारवाडा

googlenewsNext

पुणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यातील चैतन्य हास्ययाेग मंडळातर्फे शनिवारवाड्यावर दिव्यांची अारास करण्यात अाली हाेती. यंदा या उपक्रमाचे 19 वे वर्ष हाेते. 51 हजार दिव्यांनी शनिवारवाडा लखलखून गेला हाेता. हा मनमाेहक साेहळा पाहण्यासाठी हजाराे पुणेकरांनी शनिवारवाड्यावर हजेरी लावली हाेती.
 
     जीवनात अानंद, चैतन्य, उत्साह भरणारा असा दिवाळी सण. भारतात सर्वत्र दिवाळी माेठ्या उत्साहाने साजरी केली जाते. दिवाळीत घराेघरी पणत्या लावल्या जातात. तसेच घराला सजविण्यात येते. या दिव्याच्या प्रकाशातून एकप्रकारे उर्जेचा तसेच उत्साहाचा संदेश दिला जात असताे. पुण्यातील चैतन्य हास्ययाेग मंडळातर्फे गेली 18 वर्षे शनिवारवाड्याच्या प्रांगणात दिव्यांची अारास केली जाते. यंदा या साेहळ्याचे 19 वे वर्ष हाेते. 51 हजार दिवे शनिवारवाड्याच्या प्रांगणात यावेळी लावण्यात अाले. हजाराे पुणेकरांनी यावेळी हजेरी लावली. त्याचबराेबर पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापाैर मुक्ता टिळक यांनी सुद्धा या साेहळ्याला हजेरी लावत पुणेकरांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. 

    शनिवारवाड्याच्या प्रांगणात मध्यभागी पणतीच्या अाकारात दिवे लावण्यात अाले हाेते तर त्या बाजूला सर्वत्र पणतीचा प्रकाशाच्या अाकारत दिव्यांची अारास करण्यात अाली हाेती. तरुणांसाेबतच ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा अावर्जुन या साेहळ्याला हजेरी लावली. अनेकांनी हे डाेळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य अापल्या कॅमेरात बंदिस्त केले. अनेकांनी या दिव्यांच्या मध्ये उभे राहत फाेटाे काढण्याचा अानंदही लुटला. हजाराे पुणेकर या साेहळ्यासाठी उपस्थित हाेते. 

Web Title: lightning of shaniwar wada by 51 thousand divas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.