निमोणेत वादळी वाऱ्याने विजेचा लपंडाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:11 AM2021-05-18T04:11:40+5:302021-05-18T04:11:40+5:30
निमोणे आणि परिसरातील करडे, आंबळे, लंघेवाडी, चव्हाणवाडी , मोटेवाडी, गुनाट, शिंदोडी, निर्वी, चिंचणी आदी भागामध्ये गेली दोन दिवसांपासून जोराचे ...
निमोणे आणि परिसरातील करडे, आंबळे, लंघेवाडी, चव्हाणवाडी , मोटेवाडी, गुनाट, शिंदोडी, निर्वी, चिंचणी आदी भागामध्ये गेली दोन दिवसांपासून जोराचे वादळी वारे वाहत आहे. या सोसाट्याचा वाऱ्याबरोबरच ढगांचा गडगडाट आणि विजेचा प्रचंड असा कडकडाट अनुभवास येत आहे. विजेच्या या कडकडाटाने काही काळ भीतीचे वातारण निर्माण होत आहे. या वादळी वाऱ्याचा जनजीवनावर थेट परिणाम झाला आहे. सततच्या वाऱ्यामुळे सर्दी, अंगदुखी वाढत असल्याचे अनेक नागरिक सांगत आहेत,
या वादळी वाऱ्यामुळे पूर्ण वाढ झालेल्या पिकांनी भुई धरली आहे.
या वादळी वाऱ्यामुळे बहुतांश ठिकाणची वीज गायब आहे. घरगुती तसेच कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. काही भाग दोन दिवसांपासून अंधारात आहेत. लोंबकळणाऱ्या तारा वाऱ्याने एकमेकांना घासत असल्याने आगीच्या ठिणग्या आणि लोळ उडत आहे. वीजवितरण कंपनीचे कर्मचारी हा खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे.
--
फोटो क्रमांक : १७ निमोणे वादळी वारे विज पुरवठा
फोटो ओळी : निमोणे येथे खंडित विजपुरवठा दुरुस्त करताना कर्मचारी .