नुसताच गाजावाजा : पालिकेच्या बायोगॅसचे ‘दिवे’ पेटलेच नाहीत...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 12:47 PM2019-05-17T12:47:30+5:302019-05-17T13:01:10+5:30

बायोगॅस निर्मितीमधून प्रत्येकी १०० पथदिवे रोज लावले जातात असा दावा प्रशासनाने केला आहे. परंतू, विद्यूत विभागाच्या सूत्रांनी अद्याप एकही दिवा अशा प्रकारे लागला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

lights ondepend on biogas have not started ... | नुसताच गाजावाजा : पालिकेच्या बायोगॅसचे ‘दिवे’ पेटलेच नाहीत...

नुसताच गाजावाजा : पालिकेच्या बायोगॅसचे ‘दिवे’ पेटलेच नाहीत...

Next
ठळक मुद्देशहरामध्ये पालिकेने २५ बायोगॅस प्रकल्प केले होते सुरु..कोट्यवधींच्या खर्चाचा झाला चुराडा तब्बल १६ कोटी रुपये खर्च केल्यानंतर या प्रकल्पांवर आता देखभालीसाठी कोट्यवधी खर्च या प्रकल्पांमधून १२५ टन ओला कचरा जिरवून त्यामधून फायदा मिळवण्याचा उद्देश

पुणे : कचरा प्रकल्पामधून निर्माण होणाऱ्या बायोगॅसद्वारे वीज निर्मिती करुन पथदिवे ‘पेटविण्या’चा पालिकेचा उपक्रम प्रत्यक्षात उतरु शकला नाही. कोट्यवधी रुपये खर्च करुनही एकही दिवा पेटला नाही. त्यामुळे प्रशासनाने केलेला दावा खोटा ठरला असून विद्यूत विभाग आणि घनकचरा विभागामधील समन्वयाचा अभाव याला कारणीभूत ठरला आहे.  
शहरामध्ये पालिकेने २५ बायोगॅस प्रकल्प सुरु केले होते. त्यातील २२ कार्यान्वित असून यामधून बायोगॅस निर्मितीमधून प्रत्येकी १०० पथदिवे रोज लावले जातात असा दावा प्रशासनाने केला आहे. परंतू, विद्यूत विभागाच्या सूत्रांनी अद्याप एकही दिवा अशा प्रकारे लागला नसल्याचे स्पष्ट केले आहे. शहरातील सर्व पथदिवे हे महावितरणच्या वीज प्रवाहामधूनच चालत असल्याचेही सूत्रांनी सांगितले. पालिकेने १६ कोटी कोटी रुपये खर्च करुन बायोगॅसच्या माध्यमातून वीजनिर्मितीसाठी प्रकल्प उभारले. यातील बहुतांश प्रकल्पांना सध्या टाळे लागलेले आहेत. 
हे प्रकल्प उभारताना या प्रकल्पांमधून १२५ टन ओला कचरा जिरवून त्यामधून फायदा मिळवण्याचा उद्देश होता. या प्रकल्पांच्या देखभाल दुरूस्तीवर अडीच कोटींपेक्षा अधिक खर्च झाला आहे. दहा किलो ओल्या कचऱ्यापासून एक घनमीटर गॅस तयार होणे अपेक्षित आहे. १ जुलै २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत या सर्व २० प्रकल्पात कचऱ्यापासून केवळ २० टक्केच गॅस निर्मितीचे काम झाले आहे.
====
एक घन मीटर गॅसपासून १.२० युनिट्स वीज निर्माण होते. पाच टनांच्या २० प्रकल्पांमध्ये मिळून दरमहा ३ लाख ६० हजार युनिट्स वीज निर्मिती होणे अपेक्षित होते. यामधून पालिकेची दर महिन्याला २३ लाख अशी वर्षभरात पावणेतीन कोटी रुपयांच्या वीज बिलाची बचत झाली असती. प्रत्यक्षात केवळ १६ टक्केच वीजनिर्मिती झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रक्रिया प्रकल्पातून निर्माण झालेली एक युनिट वीजही पथदिव्यांसाठी वापरली जात नसल्याचे विद्युत विभागाने स्पष्ट केले आहे.
====
तब्बल १६ कोटी रुपये खर्च केल्यानंतर या प्रकल्पांवर आता देखभालीसाठी कोट्यवधी खर्च करावे लागत आहेत. पांढरा हत्ती पोसण्याचा हा प्रकार असून प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवले जात असल्याचे सांगणे हे जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासारखे आहे. हे प्रकल्प फसले असून पालिका ते मान्य करणार नाही. 
- विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच

Web Title: lights ondepend on biogas have not started ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.