मेट्रोचे डबे हलके अन् उर्जा बचत करणारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:23 AM2021-01-13T04:23:52+5:302021-01-13T04:23:52+5:30
पुण्यातील वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो मार्गांचे काम जवळपास ४८ टक्के पुर्ण झाले आहे. ...
पुण्यातील वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो मार्गांचे काम जवळपास ४८ टक्के पुर्ण झाले आहे. मेट्रो स्थानक, डेपो, भूमिगत मार्ग आदी कामे प्रगतीपथावर आहे. तसेच डब्यांची बांधणीही सुरू करण्यात आली आहे. पुणे मेट्रोसाठी एकूण ३ डब्यांचे ३४ ट्रेन संच ही कंपनी पुरविणार आहे. हे काम टिटागढ-फिरेमा या कंपनीला देण्यात आले आहे. डब्यांच्या बांधणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा कलकत्ता येथे फॅक्टरीमध्ये उभारली आहे.
डब्यांच्या प्रतिकृतीचे अनावरण नुकतेच करण्यात आले. महामेट्रोचे अध्यक्ष व शहरी विकास मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, संचालक सुनील माथुर आदी या वेळी उपस्थित होते. पुणे मेट्रोसाठीचे डबे अल्युमिनियम या धातूचे असल्याने वजनाने हलके असतील. सध्या भारतात असलेल्या मेट्रोच्या डब्ब्यांच्या तुलनेत हे सर्वात हलके डबे असणार आहेत. यामुळे मेट्रो चालवण्यासाठी लागणाºया डिझेलची दोन टक्क्यांपर्यंत बचत होणार आहे. अत्याधुनिक सुविधा असलेल्या या डब्ब्यांची क्षमता ४८ प्रवाशांची आहे. कोलकात्ता येथील कंपनीत पुणे मेट्रोच्या डब्यांची चाचणी मे महिन्याच्या अखेरीस सुरू होईल, अशी माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली.
------------