अंगाची लाहीलाही आणि पावसाचा सुखद गारवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 05:28 AM2018-04-18T05:28:23+5:302018-04-18T05:28:23+5:30

कमाल तापमान आणि किमान तापमानात झालेल्या वाढीमुळे मंगळवारी दिवसभर पुणेकरांच्या अंगाची लाहीलाही होईल, अशी उष्णता जाणवत होता़ दुपारनंतर आलेल्या पावसाच्या सरीने हवेत सुखद गारवा निर्माण झाला.

 The limb and the pleasant melting rain | अंगाची लाहीलाही आणि पावसाचा सुखद गारवा

अंगाची लाहीलाही आणि पावसाचा सुखद गारवा

Next

पुणे : कमाल तापमान आणि किमान तापमानात झालेल्या वाढीमुळे मंगळवारी दिवसभर पुणेकरांच्या अंगाची लाहीलाही होईल, अशी उष्णता जाणवत होता़ दुपारनंतर आलेल्या पावसाच्या सरीने हवेत सुखद गारवा निर्माण झाला़ सायंकाळी साडेपाचपर्यंत ०़८ मिमी पावसाची नोंद झाली होती़
शहरात या हंगामात प्रथम रात्रीचे किमान तापमान २५़२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ ते सरासरीपेक्षा ५़५ अंश सेल्सिअसने जास्त होते़ यामुळे सोमवारची रात्रही गरम जाणवत होती़ सकाळी काही वेळ ढगाळ हवामान होते़ दिवसभर रस्त्यावरुन उष्णतेच्या झळा जाणवत होत्या़ दुपारनंतर अचानक आकाशात ढगांची गर्दी झाली़ त्याचबरोबर सोसायट्याचा वार वाहू लागला़ शहरात अनेक ठिकाणी कामे सुरू असल्याने या जोरदार वाऱ्यामुळे अनेक रस्त्यांवर धुळीचे लोट पसरल्याचे दिसत होते़ काही वेळातच शहर व उपनगरात पाऊस सुरू झाला़ सुमारे अर्धा तास पडलेल्या या पावसाचा उपनगरांमध्ये जोर अधिक होता़
जोरदार वारे आणि पाऊस यामुळे शहरात ६ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या़ लॉ कॉलेज रोड, कोथरूड, शिवाजीनगर, कोरेगाव पार्क, खराडी, पर्वती दर्शन येथे झाडे पडली़ सुदैवाने त्यात कोणालाही इजा झाली नाही़ अग्निशमन दलाच्या जवानांनी ही झाडे बाजूला करून रस्ता मोकळा केला़

पावसामुळे अनेक ठिकाणी वीज गुल
अचानक आलेल्या पावसामुळे विधी महाविद्यालय रस्ता, पद्मावती, बालाजीनगर, पंचवटी तसेच हडपसर परिसरातील रामटेकडी या भागातील वीजपुरवठा सुमारे अडीच ते तीन तास खंडित झाला होता़
पाऊस व जोरदार वाºयामुळे शॉर्ट सर्किट होऊन शहरातील काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता़ मात्र, महावितरणाच्या कर्मचाºयांनी तातडीने दुरुस्ती करुन वीजपुरवठा पूर्ववत केला, असे महावितरणच्या अधिकाºयांनी सांगितले़

Web Title:  The limb and the pleasant melting rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस