माऊलींच्या प्रस्थानाला दिंड्यांतील वारकऱ्यांच्या संख्येवर मर्यादा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 12:43 PM2019-06-11T12:43:56+5:302019-06-11T13:02:55+5:30

शंभर वारकरी प्रस्थानाला मंदिरात सोडण्यास प्रशासनाने समंती दर्शवली.

Limits on the number of dindi in alandi | माऊलींच्या प्रस्थानाला दिंड्यांतील वारकऱ्यांच्या संख्येवर मर्यादा

माऊलींच्या प्रस्थानाला दिंड्यांतील वारकऱ्यांच्या संख्येवर मर्यादा

googlenewsNext
ठळक मुद्देबैठकीत निर्णय लांबणीवर : १०० संख्येवर संमतीस आग्रह मंदिराचे क्षेत्रफळ आणि सोहळ्यास दिंड्यातून मंदिरात प्रवेश करणारे वारक-यांची संख्या मोठी सोहळ्याआधीच गर्दीचा अंदाज येणार मंदिरात श्रींचे रथा पुढील आणि मागील अशा मानाच्या ४७ दिंड्याच मंदिरात प्रवेश करतात

आळंदी : माऊलींचे प्रस्थानादरम्यान मानाच्या ४७ दिंड्यांतील प्रत्येक दिंडीतील वारकरी भाविकांच्या प्रवेशावर मर्यादा आणण्यास आळंदी भक्त निवासात सोमवारी बैठक झाली. यावेळी शंभर वारकरी प्रस्थानाला मंदिरात सोडण्यास प्रशासनाने समंती दर्शवली. मात्र, या वेळी निर्णय होऊ शकला नाही. पुढील बैठकीत सर्वसंमतीने मर्यादा आणण्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.  
 आळंदी देवस्थानच्या भक्त निवासात झालेल्या समन्वय बैठकीस पोलीस उपायुक्त श्रीमती स्मार्तना पाटील, सहा पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार, तहसीलदार सुचित्रा आमले, देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील, पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविन्द्र चौधर, विवेक लावंड, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, आळंदी नगरपरिषद अधिक्षक किशोर तरकसे, अशोक राजगुरू आदी सह माऊलींच्या पालखीसोहळ्यातील दिंडी प्रमुख उपस्थित होते.  पालखी प्रस्थान सोहळ्यास मंदिरातील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रांत संयज तेली यांच्या मार्गदर्शक सुचणे प्रमाणे आळंदी देवस्थानने या बैठकीचे आयोजन केले होते. मंदिराचे क्षेत्रफळ आणि सोहळ्यास दिंड्यातून मंदिरात प्रवेश करणारे वारक-यांची संख्या मोठी असल्याने यावर निर्णय ही सभा झाली. भाविक,दिंडीकरी यांची संख्या मर्यादित ठेवण्यास पोलीस आणि महसूल प्रशासनाने सुचविले. दिंडीतील संख्या निर्धारित करण्यासाठी प्रशासनाने सुवर्णमध्ये साधण्यासाठी १०० संख्या जास्तीत जास्त असावी मात्र यापेक्षा जास्त संख्या असू नये असा सूर या बैठकीत प्रशासनाकडून निघाला. यामुळे सोहळ्याआधीच गर्दीचा अंदाज येणार असल्याने प्रस्थान सोहळा निर्विघ्न होण्यास मदत होईल अशी अपेक्षा पोलीस प्रशासनाने व्यक्त केली.  बैठकीत वारक-यांची संख्या मर्यादा शंभर करण्या बाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मात्र दिंडी प्रमुखांनी संख्या मर्यादित करण्यातील अडचणी स्पष्ट केल्या. मंदिरात प्रस्थानला प्रवेशाचे पास घेण्यास बैठकीत दिंड्याच्या प्रमुखांनी नकार दर्शविला. पोलिसांनी केलेले पास देण्याचे आवाहन फेटाळून लावले.   
........
संख्या मर्यादित करण्याचा निर्णय सवार्नुमते घेतला जाईल. त्यास मान्यता देण्यात येईल. मात्र यासाठी प्रस्थान पूर्वी होणा-या बैठकीपर्यंत वाट पाहावी लागणार असल्याने या बैठकीत संख्येवर चर्चा झाली. मात्र अंतिम निर्णय होऊ शकला नाही. सर्वच दिंडी प्रमुख सोहळ्याच्या आधी (दि.२४) आळंदीत दाखल होणार असल्याने त्यावेळी होणाऱ्या  बैठकीत निर्णय होईल. 
...........
 आळंदी प्रस्थानला मंदिरात श्रींचे रथा पुढील आणि मागील अशा मानाच्या ४७ दिंड्याच मंदिरात प्रवेश करतात. यात पुढील २७ दिंड्या आणि रथा मागील २० दिंड्या असतात. प्रवेशावर नियंत्रण आल्यास प्रस्थानला मंदिरात सुमारे पाच हजार जणांना प्रवेश मिळणार आहे. 

Web Title: Limits on the number of dindi in alandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.