‘मेक इन इंडिया’चा सिंह‘नाद’
By admin | Published: April 14, 2015 11:43 PM2015-04-14T23:43:21+5:302015-04-14T23:43:21+5:30
‘चांगले काही व्हायचे असले तर ते होऊनच जाते, मग आव्हान किती का मोठे असेना.’ - संगीतकार अजय-अतुल ‘लोकमत’शी बोलताना सांगत होते.
पराग पोतदार ल्ल पुणे
‘चांगले काही व्हायचे असले तर ते होऊनच जाते, मग आव्हान किती का मोठे असेना.’ - संगीतकार अजय-अतुल ‘लोकमत’शी बोलताना सांगत होते.
जर्मनीमध्ये भारताच्या ‘मेक इन इंडिया’चा डंका किती जोराने वाजला, हे साऱ्या जगाने पाहिलं. ढोल-ताशे, हलग्या^^- तुताऱ्यांच्या जल्लोषात नव्या भारताच्या ताकदीचे ते सादरीकरण पाहताना शिस्तीतला जर्मनीकरही त्याचे ‘एटीकेट्स’ विसरला आणि चक्क शिट्ट्या, आरोळ््या मारू लागला. संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या सादरीकरणाला संगीत होते अजय-अतुल यांचे!
सध्या नेटिझन्समध्ये कौतुकाचा विषय ठरलेली ही म्युझिक कँपेन अवघ्या १० दिवसांत तयार झाली. हा प्रवास जय-अतुल यांच्यासाठी संस्मरणीय ठरला आहे.
विझक्राफ्ट या कंपनीच्या वतीने पंतप्रधानांच्या मेक इन इंडियासाठी एक म्युझिकल कँपेन करण्याची जबाबदारी अजय-अतुलवर सोपवण्यात आली, तेव्हा दोघेही आधीच लांबलेल्या डेडलाइन्सशी झगडत होते. एका बाजूला चित्रपटांचे शेड्युल लागलेले, पण त्याचवेळी थेट पंतप्रधान कार्यालयाचे निमंत्रण! आंतरराट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करायची संधी आहे; पण वेळेची कसरत अशा द्विधा मन:स्थितीत दोघे सापडले. त्यांनी नकाराची तयारी केली तेव्हा विझक्राफ्टने थेट पंतप्रधानांनी मंजूर केलेले पीपीटी प्रेझेंटेशनच समोर ठेवले. त्यावर संगीत संयोजनासाठी नाव होते अजय- अतुल! आता आली का पंचाईत?
1जेमतेम १० दिवसांत काय, कसे करावे याची आखणी, मांडणी, नियोजन सुरू झाले.
2प्रेझेंटेशनमध्ये भारतीय शास्त्रीय नृत्याचे सारे क्लासिकल फॉर्म दिसणार होते. मणिपुरी, ओडिसी, मोहिनीअट्टम, कथ्थकली, भरतनाट्यम् हे सारे क्लासिकल प्रकार समजून घेत त्यांना संगीत देणं ही कसरत होती.
3त्यात कोरिओग्राफर बाई राजस्थानमध्ये शूटिंगमध्ये अडकलेल्या. त्यांना फोनची रेंजच नसायची. मग तुकड्या तुकड्यात त्या सूचना करायच्या. त्या बरहुकूम संगीत आकाराला येऊ लागले.
4भारतीय माणूस ज्या ज्या गोष्टींचा महोत्सव करतो ते ते सारे दिसायला हवे होते आणि त्यासाठी तसेच साजेसे संगीत हवे होते.
5बघता बघता मातीतले संगीत उसळून आले. ताशे, हलग्या, तुताऱ्या आणि बरेच़़़ संपूर्ण भारतीय संस्कृतीचे मिळून एक चक्र तयार होते आणि त्यातून ‘मेक इन इंडिया’चे बोधचिन्ह असलेला सिंह बाहेर येतो़ हे तंत्रज्ञानाच्या मदतीने अॅनिमेशनद्वारे दाखवले गेले, हा खरा अभिमानाचा क्षण. त्याक्षणी वंदे मातरम्ची धून वाजू लागते, हा असतो क्लायमॅक्स.
6हे सारे परवा जर्मनीने अनुभवले आणि आता कदाचित जिथे जिथे भारत मेक इन इंडिया नेईल तिथे तिथे ते पोहोचेल.
7अवघ्या १० दिवसांत दिलेले हे फँड्रीनंतरचे सर्वात वेगवान संगीत; तरीही उत्तम.
8मेक इन इंडियाचा सिंह अवतरताना त्या मागचा ‘नाद’ मराठमोळा आहे याची नोंद घ्यायला हवीच.
जर्मनीसारख्या देशात जिथे भारतीय पथकाचा सारा संवाद हा दुभाष्यांच्या मदतीनेच होत होता, तिथे संगीत मात्र ताकदीने पोहोचले. त्यामुळे आम्हाला हे लक्षात आले की संगीताची ताकद केवढी मोठी आहे. उद्या हॉलीवूडमध्ये संगीत द्यायची वेळ आली तरी आम्हाला आता भीती वाटणार नाही हे नक्की; कारण संगीताला भाषा नसते.
- अजय-अतुल