Video: स्वारगेट स्टँडच्या बंद बसमध्ये दारूच्या बाटल्या अन् कंडोम; सुरक्षारक्षक खरंच झोपले होते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 19:47 IST2025-02-26T19:46:12+5:302025-02-26T19:47:02+5:30

दारूच्या बाटल्या आणि कंडोमची पाकिटे सापडल्याने खळबळ उडाली असून, रात्रीच्या वेळी या आगारात गैरकृत्य घडत असल्याचा आरोप विविध राजकीय पक्षाच्या व्यक्तीनी केली

Liquor bottles and condoms in closed buses in swargate The security guard was actually asleep | Video: स्वारगेट स्टँडच्या बंद बसमध्ये दारूच्या बाटल्या अन् कंडोम; सुरक्षारक्षक खरंच झोपले होते...

Video: स्वारगेट स्टँडच्या बंद बसमध्ये दारूच्या बाटल्या अन् कंडोम; सुरक्षारक्षक खरंच झोपले होते...

पुणे : गर्दीच्या आणि वर्दळीच्या स्वारगेट बसस्थानकात बुधवारी पहाटे तरुणीवर बलात्कार झाल्याने पुणे शहर हादरले आहे. यामुळे सुरक्षेचा प्रश्न एेरणीवर आले असताना स्वारगेट आगारातील बंद बसमध्ये अनेक दारूच्या बाटल्या आणि कंडोम पाकिटे आढळले आहे. यामुळे या ठिकाणी अवैध घटना घडत असल्याचे उघड झाले आहे. यामुळे महिला, तरुणींचा सुरक्षा रामभरोसे असल्याचे उघड झाले आहे.

स्वारगेट आणि छत्रपती शिवाजीनगर या दोन्ही बसस्थानकांचा परिसर मोठा आहे. तुलनेने या परिसरात हायमास्ट दिव्यांची कमतरता असल्याने बऱ्याच परिसरात अंधार असतो. याच संधीचा फायदा गैरकृत्य करणारे घेत आहेत. शिवाय मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आणि कंडोमची पाकिचे सापडल्याने या ठिकाणच्या सुरक्षेविषयी अनेक तर्क वितर्क लढविले जात आहे. दिवसापेक्षा रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असते. शिवाय संध्या महिला प्रवाशांची संख्या वाढल्या आहेत. परंतु आगारातील कोपऱ्यात उभ्या केलेल्या बंद बसमध्ये दारूच्या बाटल्या आणि कंडोमची पाकिटे सापडल्याने खळबळ उडाली असून, रात्रीच्या वेळी या आगारात गैरकृत्य घडत असल्याचा आरोप विविध राजकीय पक्षाच्या व्यक्तीनी केली आहे. अशा घटना घडल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सुरक्षारक्षक नेमके करतात काय?

स्वारगेट बसस्थानकातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची आणि एसटीच्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक नेमले आहे. परंतु आगारातील बंद शिवशाही बसमध्ये दारूच्या बाटल्या आणि कंडोमची पाकिटे सापडल्याने सुरक्षेसाठी नेमलेल्या सुरक्षारक्षक नेमके करतात काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

Web Title: Liquor bottles and condoms in closed buses in swargate The security guard was actually asleep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.