टाकळकरवाडी शाळा आवारात दारूचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:09 AM2021-05-23T04:09:28+5:302021-05-23T04:09:28+5:30
अनुप टाकळकर, निखिल येवले, राजेश पवार, मयूर टाकळकर हे सर्व रा. टाकळकरवाडी (ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकांची ...
अनुप टाकळकर, निखिल येवले, राजेश पवार, मयूर टाकळकर हे सर्व रा. टाकळकरवाडी (ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकांची नावे आहे. टाकळकरवाडी येथील एक नामवंत शाळा म्हणून येथील जिल्हा परिषद शाळेकडे मोठ्या अभिमानाने पाहिले जात आहे. या शाळेला १०० वर्षे पूर्ण होत असून याच शाळेने गावातील अनेक हुशार विद्यार्थी घडविले आहेत. पण, सध्या शाळेकडे कोणाचेच लक्ष नसल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. कोरोनाचा काळ व सध्या उन्हाळी सुट्टी असल्यामुळे शाळा बंद आहेत. जिल्हा परिषद शाळा आवारात दिवसाढवळ्या लॉकडाऊनचा दुरुपयोग करीत या परिसरातील या मद्यशौकिनांनी दारूचा अड्डा बनविला होता. रोज भरदुपारी व रात्र झाल्यानंतर यथेच्छ दारू ढोसली जात असल्याचे वास्तव दिसत होते. तसेच मटन व मांस शिजवण्यात येत होते. अन्न शिजविण्यासाठी या शाळा आवारात विटाची चुल या युवकांनी तयार केली होती.या ठिकाणी पडलेल्या रिकाम्या दारूच्या बॉटल्स, प्लॅस्टिक ग्लास ,विविध खाद्यपदार्थाचे रिकामी पाकिटे अस्ताव्यस्त पडलेल्या याची साक्ष देतात गेल्या महिन्यापासून हा प्रकार सुरू होता. काही ग्रामस्थांनी वेळोवेळी या तरुणांना समज दिली होती.मात्र तरुण कोणाचेही ऐकत नव्हते.
खेड पोलिसांनी टाकळकरवाडी येथे शाळेत जाऊन माहिती घेतली.
फोटो ओळ: शाळा आवारात मटन, मांस शिजवण्यासाठी चूल तयार करण्यात आली होती.