मद्यसाठा जप्त
By admin | Published: June 22, 2017 06:55 AM2017-06-22T06:55:26+5:302017-06-22T06:55:26+5:30
परराज्यनिर्मित अवैधरीत्या मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तळेगाव दाभाडे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातर्फे कारवाई करण्यात आली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : परराज्यनिर्मित अवैधरीत्या मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तळेगाव दाभाडे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातर्फे कारवाई करण्यात आली आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील साते गावच्या हद्दीत एका खासगी पेट्रोलपंपाजवळ एकूण २ लाख ६८ हजार ९६० रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. सातेगाव येथे गस्त घालत असताना एक चारचाकी वाहन संशयास्पद असल्याचे दिसून आले. वाहनाची तपासणी केली असता त्यात विदेशी मध्याच्या ४८० बाटल्या सापडल्या. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यातील एकाच्या कामशेत- येवलेवाडी येथील घरी आणखी ६७२ मद्याच्या बाटल्या सापडल्या.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ व अधीक्षक मोहन वर्दे, उपअधीक्षक सुनील फुलपगार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक परब, संजय सराफ, नरेंद्र होलमुखे, रवींद्र भूमकर आदींनी ही कारवाई केली.