पिफमधील जागतिक व मराठी स्पर्धा विभागातील चित्रपटांची यादी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:11 AM2021-03-05T04:11:53+5:302021-03-05T04:11:53+5:30

पुणे : पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ११ ते १८ मार्च दरम्यान पार पडणाऱ्या ...

List of films in the global and Marathi competition section of PIF announced | पिफमधील जागतिक व मराठी स्पर्धा विभागातील चित्रपटांची यादी जाहीर

पिफमधील जागतिक व मराठी स्पर्धा विभागातील चित्रपटांची यादी जाहीर

googlenewsNext

पुणे : पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ११ ते १८ मार्च दरम्यान पार पडणाऱ्या १९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधील जागतिक व मराठी स्पर्धा विभागातील चित्रपटांची नावे गुरुवारी जाहीर करण्यात आली.

पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी जागतिक व मराठी स्पर्धा विभागातील चित्रपटांच्या नावांबरोबरच यावर्षी स्पर्धात्मक विभागाचे परीक्षण करणाऱ्या ज्युरींची नावे, मराठी सिनेमा टुडे विभागातील चित्रपट आणि महोत्सवाची ओपनिंग फिल्म देखील जाहीर केली. महोत्सवाचे कलात्मक दिग्दर्शक समर नखाते, पुणे फिल्म फाउंडेशनचे विश्वस्त सतीश आळेकर, डॉ. मोहन आगाशे, महोत्सवाचे कलात्मक प्रमुख व चित्रपट निवड समितीचे सदस्य अभिजित रणदिवे, एमआयटी स्कूल आॅफ फिल्म अँड टेलिव्हिजनचे संचालक अमित त्यागी आदी उपस्थित होते.

डॉ. पटेल म्हणाले, ‘दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील जागतिक स्पर्धा अर्थात वर्ल्ड कॉम्पिटिशन विभागात १४ तर मराठी स्पर्धा विभागात ७ चित्रपटांची निवड केली. मंगोलियाचा ‘द वुमन’ हा ओटगन्झोर बॅच्गुलुन दिग्दर्शित चित्रपट ‘ओपनिंग फिल्म’ म्हणून महोत्सवाच्या सुरुवातीला दाखवण्यात येणार आहे.’

--------------------

महोत्सवादरम्यान दरवर्षी होणारी स्टुडंट कॉम्पिटीशन या वर्षी होणार नाही. मात्र देशाबरोबरच परदेशातील एकूण ६ चित्रपट संस्थांकडून प्रत्येकी २ अशा पद्धतीने चित्रपट मागवले आहेत. महोत्सवादरम्यान हे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.

---------------------

पायरसी टाळण्यासाठी...

यावर्षीचा महोत्सव आॅनलाईन पद्धतीने देखील होणार आहे. आॅनलाईन पद्धतीने चित्रपट दाखवताना त्याची पायरसी होण्याची शक्यता असते. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने कान, बर्लिन, व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय महोत्सवात वापरलेल्या ‘शिफ्ट ७२’ या आॅनलाईन प्लॅफॉर्मचा वापर केला जात आहे. या व्यासपीठाचा वापर करणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा भारतातील एकमेव महोत्सव ठरला आहे. आॅनलाईन नोंदणी केलेल्या रसिकांना येणारी लिंक सुरक्षित असणार असून एका डिव्हाईसवरून केवळ एका वेळेसच लॉग इन करता येणे शक्य आहे. त्यानंतर रसिकांना त्या दिवसाचे चित्रपट पुढील २४ तासात कधीही पाहता येणे शक्य होणार आहे. एकदा ईमेल आयडी रजिस्टर झाला की त्यासमोर वॉटरमार्क येणार असल्याने पायरसी टाळता येणे शक्य होणार आहे.

-----------------

जागतिक स्पर्धा विभागातील चित्रपटांची नावे :

१. शुड द विंड ड्रॉप (दिग्दर्शक - नोरा मार्टिरोस्यान, फ्रान्स, अर्मेनिया, बेल्जियम)

२. इन द शॅडोज (दिग्दर्शक - अर्देम म टेपेगोज, टर्की)

३. अप्परकेस प्रिंट (दिग्दर्शक- राडू जुड, रोमानिया)

४. ए कॉमन क्राईम (दिग्दर्शक- फ्रान्सिस्को मार्केज, अर्जेंटिना/ ब्राझिल/ स्वित्झर्लंड/ यु.के)

५. द एलियन (दिग्दर्शक- नादर साइवर, इराण)

६. काला अझार (दिग्दर्शक : यानिस रफा, नेदरलँड्स / ग्रीस)

७. ट्रू मदर्स (दिग्दर्शक : नाओमी कवासे, जपान)

८. नाईट आॅफ द किंग्ज - (दिग्दर्शक : फिलीप लाकोत, फ्रान्स, कॅनडा, सेनेगल)

९. रशियन डेथ (दिग्दर्शक - व्लादिमीर मिरझोएव्ह, रशिया)

१० डिअर कॉमरेड्स (दिग्दर्शक : आंद्रेई कोंचालोव्स्की, रशिया)

११. शार्लटन (दिग्दर्शक : आन्येश्का हॉलंड, चेक/ पोलंड)

१२. द बेस्ट फॅमिलिज (दिग्दर्शक- हाविएर फ्युएन्तेस - लिआॅन, कोलंबो- पेरू)

१३. आयझॅक (दिग्दर्शक : युर्गीस मॅटुलेव्हिशीयस, लिथुएनिया)

१४. १२ बाय १२ (दिग्दर्शक : गौरव मदान, भारत)

-------------------

मराठी स्पर्धात्मक विभागातील चित्रपटांची नावे :

१. पोरगा मजेतंय (दिग्दर्शक - मकरंद माने)

२. फिरस्त्या (दिग्दर्शक- विठ्ठल मच्छिंद्र भोसले)

३. फनरळ (दिग्दर्शक - विवेक दुबे)

४. जून (दिग्दर्शक - वैभव खिस्ती आणि सुहृद गोडबोले)

५. गोदाकाठ (दिग्दर्शक - गजेंद्र अहिरे)

६. काळोखाच्या पारंब्या (दिग्दर्शक - मकरंद अनासपुरे)

७. टक-टक (दिग्दर्शक : विशाल कुदळे)

------------------------

ज्युरींची नावे :

१. गियॉर्जी बॅरन (हंगेरी- चित्रपट समीक्षक)

२. मनिया अकबारी (इराण, कलाकार व चित्रपट निर्माते)

३. लिसा रे (कॅनडा, अभिनेत्री)

४. लुआँग डिंग डांग (व्हिएतनाम, दिग्दर्शक, लेखक व चित्रपट निर्माते)

५. आंद्रे कोसॅक (स्लोव्हीया, चित्रपट निर्माते)

६. गोरान राडोव्हानोविच (सर्बिया, लेखक व चित्रपट निर्माते)

७. ए श्रीकर प्रसाद (भारत, प्रख्यात चित्रपट संपादक)

८. सुमन मुखोपाध्याय (भारत, दिग्दर्शक व चित्रपट निर्माते)

--------------------

‘मराठी सिनेमा टुडे’ विभागातील चित्रपट :

१. गोत (दिग्दर्शक : शैलेंद्र कृष्णा)

२. ताठ कणा (दिग्दर्शक : गिरीश मोहिते)

३. कंदील (दिग्दर्शक : महेश कंद)

४. मे फ्लाय (दिग्दर्शक : किरण निर्मल)

५. जीवनाचा गोंधळ (दिग्दर्शक : प्रशांत दत्तात्रय पांडेकर)

Web Title: List of films in the global and Marathi competition section of PIF announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.