नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 12:39 PM2023-04-20T12:39:57+5:302023-04-20T12:40:46+5:30

भाजप, शिवसेना वेट अँड वॉचच्या भुमिकेत असून नाराज उमेदवारांवर त्यांचे लक्ष असणार आहे....

List of candidates of NCP announced for Neera Agricultural Produce Market Committee elections | नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी जाहीर

नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी जाहीर

googlenewsNext

नीरा (पुणे) : नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आज सकाळीच आपली उमेदवारांची यादी जाहीर केली असून बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी होळकर व पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांनी आपली इच्छुक उमेदवारांची यादी जाहीर करून पक्षातील इतर सदस्यांनी आपली उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची विनंती केली आहे. 

नीरा कृषी उत्पन्न बाजार समिती नीरा पंचवार्षिक निवडणूक २०२३-२०२८ मध्ये महाविकास आघाडी पुरस्कृत सोमेश्वर सहकार विकास पॅनेल मधून पुरंदर तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदरचे व्यापारी मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार-

१) राजकुमार जयकुमार शहा.
ग्रामपंचायत मतदार संघ एस. सी. एस. टी. साठी अधिकृत उमेदवार 
१) सुशांत राजेंद्र कांबळे.
ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण गटाचे अधिकृत उमेदवार 
१) गणेश दत्तात्रय होले.
सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघाचे उमेदवार 
१) शरद नारायण जगताप
२) वामन अश्रू कामठे 

बारामती तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस बारामती 
ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण गटाचे अधिकृत उमेदवार 
१) बाळू सोमा शिंदे.

सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघाचे भ. वी. जा. साठी अधिकृत उमेदवार
१) भाऊसो विठ्ठल गुलदगड
सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघाचे महिला प्रतिनिधी साठी अधिकृत उमेदवार
१) शरयू देवेंद्र वाबळे
सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघाचे सर्वसाधरण  साठी अधिकृत उमेदवार
१) बाळासाहेब गुलाब जगदाळे. 
२) पंकज रामचंद्र निलाखे 

महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाची यादी सकाळी अकरा वाजेपर्यंत तरी जाहीर झाली नव्हती. बारामती मिशन अंतर्गत भाजप, शिवसेना युती कडून नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत सक्षम उमेदवार देण्याच्या भुमिकेत असून निवडणूक जिंकण्याचा उद्देश असल्याचा भाजपचे सचिन लंबाते यांनी सांगितले होते. भाजप शिवसेना वेट अँड वॉचच्या भुमिकेत असून नाराज उमेदवारांवर त्यांचे लक्ष असणार आहे.

Web Title: List of candidates of NCP announced for Neera Agricultural Produce Market Committee elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.