पुणे महापालिकेने बांधलेल्या रस्त्यांची अक्षरशः चाळण; आपने खड्ड्यात वृक्षारोपण करून केला निषेध

By निलेश राऊत | Published: July 28, 2023 12:48 PM2023-07-28T12:48:01+5:302023-07-28T12:48:48+5:30

दरवर्षी हजारो कोटींचा टॅक्स महापालिका पुणेकरांकडून वसूल करते, पण तशा सुविधा मात्र मिळत नाहीत

Literally sieving the roads constructed by the Pune Municipal Corporation You protested by planting trees in pits | पुणे महापालिकेने बांधलेल्या रस्त्यांची अक्षरशः चाळण; आपने खड्ड्यात वृक्षारोपण करून केला निषेध

पुणे महापालिकेने बांधलेल्या रस्त्यांची अक्षरशः चाळण; आपने खड्ड्यात वृक्षारोपण करून केला निषेध

googlenewsNext

पुणे : पुणे महापालिकेने करोडो रूपयांचा खर्च दाखवून जे रस्ते बांधले आहेत, त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. सर्व सामान्य नागरिकाना पडलेल्या मोठ मोठ्या खड्यामध्ये रस्ता शोधावा लागत आहे. याचा निषेध म्हणून आम आदमी पार्टी हडपसरच्यावतीने शुक्रवारी खड्ड्यामध्ये झाडे लावून व साचलेल्या पाण्यात होडी सोडण्यात आली.

पावसाळा सुरु होताच प्रत्येक वर्षी पुणेकारांना खड्या मध्ये रस्ते सोधण्याची करावी लागणारी कसरत थांबावी आणि पुणे महानगर पालिकेचा भ्रष्ट कारभार लोकाना दिसावा या हेतूने हे वृक्षारोपण करण्यात आल्याचे पार्टीचे सचिन कोतवाल यांनी सांगितले. यावेळी स्वप्निल गोरे, शोक हरपळे, सुनील हरपळे, शहाजी मोहिते, रवि लाटे, शुभम हांगे महाराष्ट्र अलर्ट सिटीजन फोरमच्यावतीने दिपाली सरदेशमुख यांनी व इतर अनेक नागरिकांनी सहभाग घेतला.

प्रत्येक वर्षी हजारो कोटींचा टॅक्स महानगरपालिका पुणे करांकडून वसूल करते पण तशा सुविधा मात्र मिळत नाहीत. त्यामुळे आम आदमी पार्टी, हडपसर यांच्या वतीने रस्त्यावरील खड्यात सापडत नसलेल्या रस्त्यावर उतरून पुणे महापालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

Web Title: Literally sieving the roads constructed by the Pune Municipal Corporation You protested by planting trees in pits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.