साहित्यिकांनी एका व्यक्तीच्या पायाशी विवेक गहाण ठेवू नये - फादर फ्रान्सिस दिब्रिटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 02:48 AM2018-12-24T02:48:51+5:302018-12-24T02:49:09+5:30

सहिष्णूता हा भारतीयांचा धर्म असून असहिष्णूता हा अपघात आहे. साहित्यिक, विचारवंतांची शारीरिक आणि वैचारिक हत्या केली जात आहे, हे खेदजनक आहे.

 Literary donors should not conscience at the feet of a person - Father Francis Dibryto | साहित्यिकांनी एका व्यक्तीच्या पायाशी विवेक गहाण ठेवू नये - फादर फ्रान्सिस दिब्रिटो

साहित्यिकांनी एका व्यक्तीच्या पायाशी विवेक गहाण ठेवू नये - फादर फ्रान्सिस दिब्रिटो

googlenewsNext

पुणे : सहिष्णूता हा भारतीयांचा धर्म असून असहिष्णूता हा अपघात आहे. साहित्यिक, विचारवंतांची शारीरिक आणि वैचारिक हत्या केली जात आहे, हे खेदजनक आहे. कोणा एका व्यक्तीच्या पायाशी स्वाभिमान, अस्तित्व आणि विवेक गहाण न ठेवता साहित्यिकांनी वेळोवेळी भूमिका घेऊन आवाज उठवत, ‘राजा तू नागडा आहेस’ हे ठणकावून सांगितले पाहिजे. सहिष्णू भारतात गाय महत्त्वाची की माणूस हे ठरवावे लागेल. काँग्रेसमुक्त आणि भाजपमुक्त भारत अशा गोष्टींपेक्षाही आपल्याला भीतीमुक्त आणि द्वेषमुक्त भारत हवा आहे, अशा शब्दांत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी सद्यस्थितीवर निशाणा साधला. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या विचारवंतांच्या खूनसत्रानंतर आत्माविष्कार करण्यासाठी कलाकार आणि साहित्यिक मुक्त आहेत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित १८ व्या साहित्यिक कलावंत संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात दिब्रिटो बोलत होते. नाट्यसंमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. खासदार सुप्रिया सुळे, प्रसिद्ध शिल्पकार सुनील देवरे, संयोजक दिलीप बराटे आणि काका चव्हाण उपस्थित होते. साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष
दिलीप बराटे यांनी प्रास्ताविक
केले.
प्रतिष्ठानचे सचिव वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. देवेंद्र सूर्यवंशी यांनी आभार मानले.

हिंसाचाराने विचारवंतांचा कोंडमारा होतो

1या देशातील सामान्य माणूस लोकशाहीचा संरक्षक आहे. परंतु, दुर्दैवाने अधूनमधून आपल्याकडे विचारांची गंगा उलट दिशेने वाहू लागते. आपला प्रवास असहिष्णुतेकडे, संकुचितपणाकडे, ठोकशाही आणि अराजकतेच्या दिशेने होऊ लागतो. काहींच्या भावना पटकन दुखावल्या जातात. धर्म, जात, भाषा, प्रांत, ऐतिहासिक व्यक्तींविषयी चिकित्सक भाष्य केले की संबंधित गट उजळून उठतात. कायदा हाती घेऊन प्रसंगी हिंसाचाराचा अवलंब करतात. विभूतीपूजा, कर्मठपणा आणि पोथीनिष्ठा वाढत असल्याने हाडाच्या संशोधकांची कुचंबणा आणि विचारवंतांचा कोंडमारा होतो, असे दिब्रिटो म्हणाले.

2 गज्वी म्हणाले, ‘प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवत घराबाहेर संविधान हाच आधार मानला पाहिजे. हिंदू राष्ट्राचा आग्रह धरला जात असल्याने संविधान मूल्यांना तडा जात आहे. संभ्रमित अवस्था निर्माण करून सामान्यांचा गोंधळ उडविण्याचे काम केले जात आहे.’

आपली आणि उद्याची पिढी यांच्यात साहित्याची सांगड घालणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या मातीत सांस्कृतिक समृद्धीची, साहित्याची बीजे पेरलेली आहेत. लोकशाहीचे मंदिर असलेल्या लोकसभेमध्ये सत्ताधारी फारसे अनुकूल नसतानाही आम्ही समलिंगी संबंधांना आणि सरोगसी विषयाचे विधेयक संमत करून घेतले. राष्ट्रवादीकडून आगामी निवडणुकीत एका तरी तृतीयपंथीला तिकीट दिले जाईल, असा आग्रह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे धरणार आहे.
- सुप्रिया सुळे
 

Web Title:  Literary donors should not conscience at the feet of a person - Father Francis Dibryto

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे