भाषादिनानिमित्त ‘चपराक’चा साहित्य महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:22 AM2021-02-21T04:22:25+5:302021-02-21T04:22:25+5:30
उद्या ( दि. 21) सकाळी 11 वाजता सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या ‘अर्धशतकातील अधांतर - इंदिरा ते मोदी’ या ...
उद्या ( दि. 21) सकाळी 11 वाजता सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या ‘अर्धशतकातील अधांतर - इंदिरा ते मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी आणि निवेदक सुधीर गाडगीळ यांची या वेळी विशेष उपस्थिती असेल. सोमवारी (दि.,22) विनोद पंचभाई यांच्या ‘मेवाडनरेश महाराणा प्रताप’ या कादंबरीचे आणि रमेश वाघ यांच्या महाराष्ट्राचे विचारदुर्ग या संतचरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन होईल. गुन्हेगारी क्षेत्रातील महिलांवर आधारित असलेल्या सुरेखा बोर्हाडे यांच्या बाईची भाईगिरी या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी (दि.23) करण्यात येईल.
बुधवारी (दि.24) जयदीप विघ्ने यांचा भोंगळा पाऊस आणि जयश्री सोन्नेकर यांच्या व्यथिता या कथासंग्रहांचे प्रकाशन तर गुरूवारी (दि.25) वैद्य ज्योति शिरोडकर यांच्या ‘आरोग्यतरंग’ या पुस्तकावर एमकेसीएलचे विवेक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.