भाषा टिकविण्याची जबाबदारी साहित्यिकांवर - सुप्रिया सुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 03:23 AM2018-06-14T03:23:17+5:302018-06-14T03:23:17+5:30
भाषा टिकविण्याची जवाबदारी साहित्यिकांवर अधिक आहे. प्रत्येकाला आपल्या भाषेतील गोडवा आवडतो; परंतु आपल्या भाषेवर प्रेम करतानाच दुसऱ्या भाषेबद्दल मात्र मनात द्वेष नसावा, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
वारजे - भाषा टिकविण्याची जवाबदारी साहित्यिकांवर अधिक आहे. प्रत्येकाला आपल्या भाषेतील गोडवा आवडतो; परंतु आपल्या भाषेवर प्रेम करतानाच दुसऱ्या भाषेबद्दल मात्र मनात द्वेष नसावा, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
पुणे मनपा मराठी भाषासंवर्धन समितीअंतर्गत वारजे येथील गंगूबाई धुमाळ बालोद्यान व विरंगुळा केंद्रात सुरू करण्यात आलेल्या साहित्यिक कट्ट्याचे उद्घाटन सुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी ज्येष्ठ साहित्यिक न. म. जोशी, महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके, लक्ष्मी दुधाणे, सायली वांजळे, डॉ. माधवी वैद्य, वि. दा. पिंगळे, संयोजिका नगरसेविका दीपाली धुमाळ, बाबा धुमाळ उपस्थित होते. बाबा धुमाळ यांनी आभार मानले.
सुळे म्हणाल्या, की नवीन पिढी वाचनापासून दूर जात असून ती फेसबुक, व्हॉट्सअॅप यासारख्या सोशल मीडियामध्ये अडकत आहे. चांगल्या व्याख्यानांचे कार्यक्रमही कमी होत चालले आहेत. त्यामुळे अशा या साहित्यिक कट्ट्याच्या माध्यमातून नव्या पिढीला साहित्याकडे आकर्षित करण्याचे प्रामाणिक प्रयत्न झाले पाहिजेत. ग. दि. माडगूळकर यांच्याबद्दलची माहिती येणाºया पिढीला कळावी म्हणून त्यांच्या नावाने एक वास्तू पुण्यात व्हावी, यासाठी आमचा पाठपुरावा चालू असून ती वास्तू खडकवासला मतदारसंघात होण्यासाठी प्रयत्न करीत आहे.