Pune Crime: छोट्या भावाने छेड काढली; मोठ्या भावाने केला बलात्कार, दोघांच्या आवळल्या मुसक्या
By नम्रता फडणीस | Updated: November 30, 2023 18:03 IST2023-11-30T18:02:31+5:302023-11-30T18:03:26+5:30
अलंकार पोलिसांनी दोघा भावांना अटक केली आहे....

Pune Crime: छोट्या भावाने छेड काढली; मोठ्या भावाने केला बलात्कार, दोघांच्या आवळल्या मुसक्या
पुणे : शाळकरी मुलीला धमकावून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अलंकार पोलिसांनी दोघा भावांना अटक केली आहे.
किशोर परमेश्वर केदार (वय २३), नकुल परमेश्वर केदार (२१, दोघे रा. कोथरुड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत शाळकरी मुलीने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडिता शिकवणीला जायची. आरोपी नकुल तिची छेड काढायचा. छेडछाडीमुळे घाबरलेल्या मुलीने नकुलचा मोठा भाऊ
किशोर याच्याकडे तक्रार केली. किशोरने मुलीला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. माझ्या भावाची तक्रार केल्यास तुला जिवे मारू, अशी धमकी दिली.
मुलीला जातिवाचक शिवीगाळ केली. मुलीने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून किशोर आणि नकुल यांना अटक केली. पोलिस उपनिरीक्षक शेख तपास करीत आहेत.