"धावून ये मज तारुन ने श्रीरंगा, पुरे झाला हा कोरोना", आषाढीनिमित्त चिमुकलीचं विठ्ठलाला साकडं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 02:46 PM2021-07-19T14:46:54+5:302021-07-19T18:11:30+5:30
वारकरी वेशभूषा प्रदान करून तिने छान प्रार्थनेचा व्हिडिओ तयार केला आहे.
पुणे: पांडुरंगा पुरे झाला हा कोरोना, धावून ये मज श्रीरंगा पुरे झाला कोरोना चिमुकलीने आषाढीनिमित्त सुंदर प्रार्थना तयार करत विठ्ठलाकडे प्रार्थना केली आहे. ओवी आनंद जगताप असे पुण्यातील धायरी परिसरात राहणाऱ्या चिमुकलीचे नाव आहे. वारकरी वेशभूषा प्रदान करून तिने छान प्रार्थनेचा व्हिडिओ तयार केला आहे. याबद्दल ओवीच्या आईने लोकमतला माहिती दिली.
प्राथमिक शाळेतील विद्यार्थी घरी बसून कंटाळले आहेत. वर्गातील शिक्षण, खेळ, शिक्षकांचे ओरडणे, ती दंगा मस्ती या शाळेतल्या मजेशीर गोष्टींपासून दुरावले आहेत. शाळेत जायचं, बागेत फिरायचं पांडुरंगा पुरे झाला हा कोरोना अशी विनंतीही ओवी देवाकडे करत आहे.
कोरोना महामारीच्या संकटाने सण, उत्सव, वारी यावर बंधने आली आहेत. त्यामुळे दोन वर्षात महाराष्ट्रात आषाढी वारी झाली नाही. दरवर्षी लाखो वारकरी, नागरिक आषाढी एकादशीला पंढरीला जात असतात. पण कोरोनामुळे सर्वांना या सोहळ्यापासून मुकावे लागले आहे. घरात बसूनही शाळेतील मुले कंटाळली आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे संकट निघून जाऊ दे आणि तुझ्या भेटीची इच्छा लवकरच पूर्ण होऊ दे. अशीही इच्छा ओवीनी प्रार्थनेतून व्यक्त केली आहे.
नमस्कार,
मी विठोबाला अशी प्रार्थना करते की हे कोरोनाचे संकट लवकरत लवकर मिटू दे, आम्हा वारकऱ्यांची तुझ्या भेटीची ओढ पूर्ण होऊ दे
''धावून ये मज तारुण ने श्रीरंगा पुरे झाला हा कोरोना, क्षमा कर हरी चुकली ही वारी पांडुरंगा, पुरे झाला हा कोरोना,
शाळेला जायचय, बागेत फिरायचंय पांडुरंगा, पुरे झाला हा कोरोना, अलीकड ये मला पलीकडे ने नदी भरली चंद्रभागा,
पुरे झाला हा कोरोना''