Live In Relationship मध्ये राहणाऱ्या प्रियकराने प्रेयसीची अब्रू चव्हाट्यावर मांडली, पुण्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 08:23 PM2022-12-22T20:23:10+5:302022-12-22T20:23:10+5:30

पन्नास वर्षीय प्रियकरावर पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Live-in-relationship boyfriend defames girlfriend, incident in Pune | Live In Relationship मध्ये राहणाऱ्या प्रियकराने प्रेयसीची अब्रू चव्हाट्यावर मांडली, पुण्यातील घटना

Live In Relationship मध्ये राहणाऱ्या प्रियकराने प्रेयसीची अब्रू चव्हाट्यावर मांडली, पुण्यातील घटना

googlenewsNext

पुणे/किरण शिंदे : सध्याच्या तरुणाईमध्ये लिव्ह-इन-रिलेशनशिपचे आकर्षण आहे. मागील काही वर्षात लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यांची संख्या वाढली असतानाच दोघांमध्ये लहान-सहान गोष्टींवरून होणारे वादही वाढले आहेत. काही वेळा केव्हा जातात त्यातून गंभीर गुन्हे घडतात. पुण्यातील कोंढवा परिसरात असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या पार्टनरसोबत बिनसल्यानंतर एकाने प्रेयसीचे खासगी फोटो सोशल मीडियावर टाकले. याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार 50 वर्षीय प्रियकरावर पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला घटस्फोटीत आहे. मागील काही दिवसांपासून ती फिर्यादीसोबत लिव्ह-इन-रिलेशनशिप मध्ये राहत होती. दोघेही येवलेवाडी परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. दरम्यान मागील तीन ते चार महिन्यांपासून त्यांच्या वाद सुरू झाले. आणि तेव्हापासून ते वेगळे राहू लागले. या दोघांतील वाद इतके टोकाला गेलेत की आरोपीने प्रेयसीचे खाजगी फोटो स्वतःच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट केले. हा प्रकार जेव्हा फिर्यादी महिला लक्षात आला तेव्हा तिने त्याला फोन करून याविषयी जाब विचारला. त्यानंतर मात्र आरोपीने या महिलेलाच स्वीकार केली. 

या संपूर्ण प्रकारानंतर फिर्यादी महिलेने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी 354 क, 500, 507 आयटी ऍक्ट 66 ई 67 या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Live-in-relationship boyfriend defames girlfriend, incident in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.