लोकसहभागातून पावसाची ‘लाइव्ह’ माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:10 AM2021-07-31T04:10:36+5:302021-07-31T04:10:36+5:30
महाराष्ट्रातील कोणत्याही भागांतील नागरिक या वेबसाईटवर आपल्या भागात सुरू असलेल्या पावसाची दृश्य स्वरूपातील नोंद करू शकतात. त्यांची नोंद तत्काळ ...
महाराष्ट्रातील कोणत्याही भागांतील नागरिक या वेबसाईटवर आपल्या भागात सुरू असलेल्या पावसाची दृश्य स्वरूपातील नोंद करू शकतात. त्यांची नोंद तत्काळ गुगल मॅपवर त्यांच्या निरीक्षणाच्या तपशीलासह दिसू लागते. यामध्ये पावसाचे स्वरूप, वाऱ्यांचे स्वरूप, पाणी साचणे, फ्लॅश फ्लड, झाडे पडणे, दरड कोसळणे, रस्ता खचणे, भिंत पडणे आदी घटनांचा समावेश आहे. निरीक्षण नोंदवण्यासाठी नागरिकांना त्यांच्या स्थाननिश्चितीसाठी ‘जीपीएस’ला परवानगी देणे आवश्यक आहे. वेबसाईटला भेट देणाऱ्या सर्वांना गेल्या एक, तीन, सहा आणि बारा तासांतील पावसाच्या नोंदी नकाशावर दिसू शकतात.
या शिवाय वेबसाईटवर सध्याची उपग्रहीय आणि रडार चित्रे, आयएमडीचा पुढील २४ तासांचा पावसाचा अंदाज, हवामानाशी संबंधित उपयुक्त वेबसाईट, आपत्कालीन परिस्थितीत उपयुक्त ठरणारे संपर्क क्रमांक यांचीही माहिती मिळू शकेल.