लिव्ह-इन रिलेशन महिलांसाठी घातक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:10 AM2021-03-08T04:10:14+5:302021-03-08T04:10:14+5:30
(लेखिका सामाजिक विषयाच्या प्राध्यापक आहेत) अलीकडे लिव्ह इन रिलेशन विषयावर जरा जास्तच भर दिला जातोय आणि लेखांमधून त्याचा प्रसार ...
(लेखिका सामाजिक विषयाच्या प्राध्यापक आहेत)
अलीकडे लिव्ह इन रिलेशन विषयावर जरा जास्तच भर दिला जातोय आणि लेखांमधून त्याचा प्रसार केला जातोय की काय? अशी परिस्थिती आहे. पण या नात्याविषयी अनेक प्रश्न उभे राहतात. या नात्यात आपण काय? आलो, याविषयी बहुतेक सगळ्यांनी लग्नाचा अनुभव चांगला नाही, असे कारण सांगितले. आता कोणतीही दोन माणसं चोवीस तास एकत्र आली की त्यांचे गुण अवगुण एकमेकांना सहन करणचं भाग असतं. मग फरक काय?
घटस्फोट न घेता एकमेकांबरोबर राहणारे ही आहेत. हे कसलं नातं. दुसऱ्या स्त्री वर किंवा पुरुषावर अन्याय करणारे हे कसलं नातं. या नात्यात फसलेल्या व्यक्तीही आहेत. परंतु ती उदाहरणे डावलून केवळ चांगली उदाहरणे दिली जातात. या नात्यातल्या व्यक्तींचा तरी एकमेकांवर विश्वास आहे का, की परस्परांवर संशय आणि नात्यात असुरक्षितता वाटते. काय? असतं लग्नाची बायको म्हटली की हक्काने विचारू शकते. हिला तेही अधिकार नाहीत. उद्या बरोबर राहणाऱ्याने फसवले, दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवले तर ही दादही मागू शकणार नाही. अशा नात्यात फसून अक्षरशः रस्त्यावर आलेल्या स्त्रिया आहेत. त्यांना केवळ पेन्शन मिळत असल्याने त्यांची आयुष्य सावरली गेलीत. त्यांचा मोठा विश्वासघात झाला. त्याचं काय? एका विशिष्ट वर्गात या नात्याचं काही वाटत नाही परंतु बाकी वेळी आपलं नाव या व्यक्ती प्रसिद्ध करू देत नाहीत. या नात्यात काही वर्षे राहून नंतर दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करतात. यात स्त्रीचं आयुष्य अधांतरी होतं
कुणी कुणाच्या पैशात वाटा मागू नये किंवा हक्क सांगू नये यासाठी हा आटापिटा. काही नात्यात तर पुरुषाची आर्थिक परिस्थिती बिकट म्हणून पैशासाठी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असलेल्या स्त्रीशी नातं जोडलयं.
या नात्यात सहचर पाहिजे म्हणून वर्तमानपत्रात जाहिराती येतात. तेव्हा त्यात आर्थिक व्यवहार वेगळे ठेवले जातील, असे स्पष्ट लिहिले जाते. पण एखाद्याला अचानक मोठं आजारपण निघालं तर काय? आणि असं करणं म्हणजे स्त्रीचा वापर करणं नाही काय? बरं कुटुंबातल्या इतर व्यक्ती हे नातं स्वीकारतीलच असं नाही विशेषतः पुरुषांकडून म्हणजे बाईची फरपट. त्यातच पुरुषाचे अकाली निधन झाले तर पुन्हा ती एकटी पडते. कारण कायदा तिला कुठलेच अधिकार देत नाही.