वाहतूककोंडी फोडण्यावर असणार भर - डॉ. के. वेंकटेशम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 03:26 AM2018-08-25T03:26:42+5:302018-08-25T03:27:35+5:30
अपघात झाल्यानंतर ट्रॅफिकमुळे रुग्णाला वेळेवर रुग्णालयात पोहोचविणे शक्य होत नसल्याची स्थिती सध्या पुण्यात आहे. त्यामुळे अद्ययावत तंत्रज्ञान, अंमलबजावणी व लोकशिक्षण या त्रिसूत्रीच्या आधारे शहरातील
पुणे : अपघात झाल्यानंतर ट्रॅफिकमुळे रुग्णाला वेळेवर रुग्णालयात पोहोचविणे शक्य होत नसल्याची स्थिती सध्या पुण्यात आहे. त्यामुळे अद्ययावत तंत्रज्ञान, अंमलबजावणी व लोकशिक्षण या त्रिसूत्रीच्या आधारे शहरातील वाढती वाहतूककोंडी व अपघातांचे प्रमाण कमी करण्यावर पोलीस प्रशासनाचा भर असेल, असे मत नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी व्यक्त केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापात डॉ. वेंकटेशम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गुुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे उपस्थित होते. डॉ. वेंकटेशम म्हणाले, ‘‘वाहनचालकांना दंड आकारणे, कारवाई करणे हा पोलिसांचा उद्देश नाही; मात्र नागरिकांनीही वाहतुकीबाबत स्वयंशिस्त पाळली पाहिजे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर दंड न भरणाऱ्या व्यक्तींची वाहने जमा करण्यात येणार आहेत. तर, पोलिसांना धक्काबुक्की करणाºयांवर गंभीर कारवाई करण्यात येईल. त्यांच्यावर दाखल होणारे खटले जलद गतीने चालविण्यात यावेत, अशी विनंतीदेखील न्यायालयाला करण्यात येणार आहे’’
नागरिकांना तत्काळ मदत आणि सेवा मिळणे तसेच त्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेवून त्यावर कारवाई करण्यासाठी पुणे पोलिसांनी व्हॉटस्अप सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यात शुक्रवारपासून ८९७५२८३१०० आणि ८९७५९५३१०० दोन नवीन क्रमांक सुरू केले आहेत. नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी पोलिसांनी व्हॉट्सअॅप क्रमांक दिला असून त्यावर दररोज ३० ते ४० तक्रारी येतात. वाहतूक कोंडीची तक्रार करण्यासाठी पोलिसांनी आत्तापर्यंत तीन व्हॉटस्अॅप क्रमांक सुरू केले आहेत. वाहतुक विभागाशी संबंधित तक्रार करण्यासाठी ८४११८००१०० हा क्रमांक देण्यात आला आहे.
बडी कॉप व सिटी सेफ अॅपची व्याप्ती वाढविणार
नागरिकांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या बडी कॉप आणि सिटी सेफ अॅपला चांगली पसंती मिळाली असून त्यातून अनेक गुन्हेगारांवर वचक बसविण्यात आला आहे. त्यामुळे या अॅपची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. सेवा नावाची एक यंत्रणा उभारली जाणार असून, त्याद्वारे नागरिकांनी केलेल्या तक्रारीचे काय झाले, याची माहिती त्यांना दिली जाणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले.
सायबर क्राईम नवे आव्हान
सायबर क्राईम करणाºया व्यक्ती पोलिसांच्या तुलनेत तंत्रज्ञानात पुढे आहे. कॉसमॉस बँकेवर झालेल्या सायबर हल्ल्याच्या प्रकरणापासून सायबर गुन्हे शाखेतील कर्मचाºयांना अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. अशा प्रकारचे गुन्हे हातळण्यासाठी खासगी संस्थांची मदत घेण्यात येत आहे. इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण झाल्यानंतर सायबर पोलीस ठाणेदेखील सुरू करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. वेंकटेशम यांनी दिली.