ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बिलातून कर्जवसुली, शेतकरी संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 12:43 AM2018-12-22T00:43:01+5:302018-12-22T00:43:28+5:30
दुष्काळ जाहीर झाल्यानंतर कर्जमाफी करायचे सोडून शेतक-यांनी सोसायटीतून घेतलेले कर्ज संत तुकाराम साखर कारखान्याने शेतक-यांच्या बिलातून कापून घेतल्याने ऊसउत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत.
चाकण - दुष्काळ जाहीर झाल्यानंतर कर्जमाफी करायचे सोडून शेतक-यांनी सोसायटीतून घेतलेले कर्ज संत तुकाराम साखर कारखान्याने शेतक-यांच्या बिलातून कापून घेतल्याने ऊसउत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यामुळे शेतकºयांच्या बिलातून कर्जवसुली करू नये, अशी मागणी खेड तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली असून, ही जुलमी वसुली थांबवली नाही तर कायदेशीर कारवाई करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने ऊसउत्पादक शेतक-यांच्या बैठकीत दिला आहे.
साखर कारखान्याच्या सभासद शेतकºयांनी सोसायटीकडून घेतलेले कर्ज शेतकºयांना न सांगता कारखान्याने परस्पर वसुली सुरू केली आहे. शेतकºयांनी सोसायटीकडून घेतलेले कर्ज वसुली करण्याचा अधिकार साखर कारखान्याला नाही, ते बेकायदेशीर असून, शेतकºयांची पिळवणूक केली जात आहे. शेतकºयांची ही रक्कम तातडीने परत करावी; अन्यथा आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. केंद्रीय साखर नियंत्रण कायदा १९६६ अनुसार देशातील शेतकºयांनी गाळपासाठी ऊस विकल्यानंतर १४ दिवसांत उसाची रास्त व किफायतशीर किंमत अर्थात एफआरपी देणे बंधनकारक आहे. साखर कारखान्याने शेतकºयांना २१०० रुपये एफआरपी दिली असून, ती कमी आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे. उसाला पहिली उचल एकरकमी एफआरपी देणे हे ऊसदराच्या तोडग्यात ठरले आहे. त्यामुळे कारखान्याने २७५० रुपयेप्रमाणे एफआरपी देणे क्रमप्राप्त आहे. तरीही ती शेतकºयांना एकरकमी न देता टप्प्याटप्प्याने दिली जात असून, ती एकरकमी द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.