‘टॉयलेट’ रद्द करण्यासाठी महापालिकेतच कार्यरत आहे ‘लॉबी’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 08:51 PM2019-03-11T20:51:16+5:302019-03-11T20:58:02+5:30
राजकारण आणि आर्थिक कारणामुळे स्वच्छतागृहाचे काम पूर्ण झाले नसल्याच्या कथांना उधाण आले आहे....
- माऊली शिंदे -
कल्याणीनगर : एखाद्या व्यावसायिकाच्या जागेसमोर स्वच्छतागृह तयार करण्याचा प्रस्ताव दाखल करायचा. ह्या प्रस्तावाचे पत्र व्यावसायिकाला द्यायची. त्यानंतर आर्थिक साटेलोटे करायचे. आणि यातून तो स्वच्छतागृह होऊ द्यायचे नाही. हा स्वच्छतागृहाचा पॅटर्न सध्या जोरात असल्याची माहिती एका राजकीय प्रतिनिधींनी दिला. यामुळे स्वच्छतागृहाचे चोरी प्रमाण वाढत आहे. दोन वर्षांपूर्वी विमाननगर आणि कोरेगावपार्कमध्ये अशी प्रकारच्या स्वच्छतागृहाच्या चोऱ्या झाल्या आहेत.
नगररोड वडगावशेरी क्षैत्रिय कार्यालयाने काही महिन्यापुर्वी विमानगर येथील गिगास्पेस जवळ एका स्वच्छतागृहाचे काम सुरू केले होते. पण अचानक या स्वच्छतागृहाचे काम बंद करण्यात आले. राजकारण आणि आर्थिक कारणामुळे स्वच्छतागृहाचे काम पूर्ण झाले नसल्याच्या कथांना उधाण आले आहे. दरम्यान, दोन वर्षापूर्वी विमाननगर येथील एक स्वच्छतागृह रात्रोरात्र चोरीला गेले होते. अशा प्रस्तावित पण न झालेल्या टॉयलेट (स्वच्छतागृहा)च्या कथांची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
नगररोड वडगावशेरी क्षेत्रिय कार्यालयांतर्गंत येणाऱ्या वडगावशेरी, चंदननगर, खराडी, विमाननगर, कल्याणीनगर, गांधीनगर या भागाची लोकसंख्या तीन लाखांपेक्षा जास्त आहे. मात्र,या परिसरातील स्वच्छतागृहाची संख्या फक्त सात आहे. नागरिकांच्या सोयीसाठी अनेकदा स्वच्छतागृहाच तयार करण्याची प्रस्ताव दिले जातात. स्वच्छतागृहांसाठी निधी दिला जातो. मात्र, प्रत्यक्षात स्वच्छतागृह तयार होत नाही.
* स्वच्छतागृह गेले चोरीला
विमानगर परिसरामध्ये अनेक आयटी पार्क आणि हॉटेल्स आहेत. मात्र, या परिसरामध्ये एकच स्वच्छतागृह आहे. या भागामध्ये स्वच्छतागृह करण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी देण्यात आले होते. या प्रस्तावानुसार आयबीएस हॉटले काश्मीर सोप या रस्त्यावर स्वच्छतागृहाचे काम सुरू केले होते. या स्वच्छतागृहाला काही व्यवसायिकांनी विरोध केला होता. मात्र, त्यांनतरही स्वच्छतागृहाचे काम पुर्ण केले होते. मात्र, अचानक एका रात्रीमध्ये स्वच्छतागृह चौरीला गेले. या स्वच्छतागृहाच्या चोरीची तक्रार पोलिस चोकीत करण्यात आली होती. मात्र, तक्रारीनंतर ही पुढील तपास झाला नाही..
* एका फोनमध्ये काम पाडले बंद
याच प्रमाणे विमाननगर गिगास्पेस जवळ स्वच्छतागृह बांधण्यासाठी निधी देण्यात आला होता. या स्वच्छतागृहाचे काम अर्धवट झाले होती. मात्र, स्वच्छतागृहामुळे व्यवसायाला डाग लागले. यामुळे एका व्यवसायिकांनी फोन फिरवला. स्वच्छतागृहाचे काम बंद पडले. त्यांनतर राजकीय दबावात तसेच अर्थकारणामुळे स्वच्छतागृहाचे काम सुरूच झाले नसल्याच्या कथा विमाननगर मध्ये चर्चिल्या जाऊ लागल्या आहेत.
स्वच्छतागृहाची गरज असताना. पालिकेच्या जागेतील स्वच्छतागृहाचे काम कसे बंद पडते. स्वच्छतागृहाबाबत क्षैत्रिय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी ठाम भुमिका घ्यावी अशी मागणी नागरीक करू लागले आहे.
.............................
चोरीच्या स्वच्छतागृहाबाबत काहीच माहित नाही. गिगास्पेस जवळ पेट्रोलपंप बनणार आहे. त्यामुळे तेथील काम बंद केले असल्याचे समजत आहे. मात्र,याबाबत अधिक माहिती घेऊन सांगतो. सोपान पगार, उपअभिंयता, नगररोड क्षेत्रिय कार्यालय.