Pune | शिवाजीनगर स्थानकातून लवकरच सुटणार लोकल; नवीन प्लॅटफॉर्मचे काम अंतिम टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 08:58 AM2023-01-03T08:58:36+5:302023-01-03T09:00:04+5:30

पुणे स्टेशनवरील भार देखील कमी होणार ....

Local train will soon depart from Shivajinagar station; New platform work in final stage | Pune | शिवाजीनगर स्थानकातून लवकरच सुटणार लोकल; नवीन प्लॅटफॉर्मचे काम अंतिम टप्प्यात

Pune | शिवाजीनगर स्थानकातून लवकरच सुटणार लोकल; नवीन प्लॅटफॉर्मचे काम अंतिम टप्प्यात

Next

पुणे :शिवाजीनगर येथील नवीन प्लॅटफॉर्मचे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या काही दिवसांतच ट्रायल झाल्यावर येथून लोकल सुटणार आहेत. पुणे स्टेशन येथे यार्ड रिमोल्डिंगचे (प्लॅटफॉर्म मोठा करणे) काम होणार असल्याने हा बदल करण्यात आला आहे. १२ पेक्षा अधिक लोकल शिवाजीनगर येथूल सुटणार असल्याने विद्यार्थी, नोकरदार व अन्य प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. तसेच यामुळे पुणे स्टेशनवरील भार देखील कमी होणार आहे.

पुणे ते लोणावळादरम्यान दररोज लाखो नोकरदार, विद्यार्थी व अन्य प्रवासी लोकलने प्रवास करत असतात. पुणे स्टेशन ते लोणावळा सध्या ४० लोकलच्या फेऱ्या सुरू आहेत. (२० जाण्यासाठी-२० येण्यासाठी) पुण्यासह पिंपरी-चिंचवड येथील शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, आयटी कंपन्या आणि एमआयडीसीमुळे दररोज लाखो प्रवासी या लोकलच्या साहाय्याने शहरात ये-जा करतात. रेल्वेचा प्रवास स्वस्त असल्याने या रेल्वेंना गर्दी देखील असते. गेल्या काही दिवसांपासून ही सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. पण लवकरच लोकल सेवा सुरळीत होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आली.

शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवरील नवीन प्लॅटफॉर्मचे काम येत्या १५ ते २० दिवसांत पूर्ण होणार असून, त्यानंतर लगेचच येथून लोकल सेवा सुरू होऊ शकते. पहिल्या टप्प्यात सहा लोकल शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवरून सुटतील, अशी माहिती देखील रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

Web Title: Local train will soon depart from Shivajinagar station; New platform work in final stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.