येरवड्यातील सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:09 AM2021-03-22T04:09:19+5:302021-03-22T04:09:19+5:30

अनिकेत काकडे याच्यावर सदोष मनुष्यवध,जबरी चोरी, घातक शस्त्र बाळगून वाहनांची तोडफोड करणे, जबरी चोरी, बेकायदेशीर हत्यार बाळगणे अशा स्वरूपाचे ...

Location action against criminals in Sarai, Yerwada | येरवड्यातील सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई

येरवड्यातील सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई

Next

अनिकेत काकडे याच्यावर सदोष मनुष्यवध,जबरी चोरी, घातक शस्त्र बाळगून वाहनांची तोडफोड करणे, जबरी चोरी, बेकायदेशीर हत्यार बाळगणे अशा स्वरूपाचे मागील सात वर्षांपासून सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. वारंवार गुन्हे करत त्याने येरवडा परिसरात दहशत माजवली होती. त्याच्या गंभीर गुन्ह्याची पार्श्‍वभूमी लक्षात घेता त्याच्याकडून येरवडा परिसरात आणखी गुन्हे घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी याबाबत अनिकेत काकडे यांच्यावर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांना सादर केला होता. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी १९ मार्च २०१२ रोजी त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आतापर्यंत शहरातील १६ सराईत गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यानुसार येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले आहे. सन २०२१ मध्ये केलेली ही नववी कारवाई असून अशा प्रकारे दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर यापुढील काळात देखील कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत.

Web Title: Location action against criminals in Sarai, Yerwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.