कुलपाअाड असलेल्याच उघडणार अापल्या भविष्याचं कुलुप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 06:35 PM2018-08-14T18:35:17+5:302018-08-14T18:36:49+5:30

येरवडा महिला कारागृहातील महिला कैद्यांना कुलुप तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार अाहे. ज्या माध्यमातून या महिलांना एक राेजगाराची संधी उपलब्ध हाेणार अाहे.

lock making training will be givan to women prisoner | कुलपाअाड असलेल्याच उघडणार अापल्या भविष्याचं कुलुप

कुलपाअाड असलेल्याच उघडणार अापल्या भविष्याचं कुलुप

Next

पुणे : हातून गुन्हा घडताे अाणि पुढचं अायुष्य अंधाऱ्या खाेलीत कुलपाअाड घालवावं लागतं. महिलाांच्या हातून एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याची झळ संपूर्ण कुटुंबाला साेसावी लागते. तुरुंगाच्या बंद कुलपाअाड असलेल्या महिला अाता अापल्या भविष्याचं कुलुप उघडणार अाहेत. येरवडा कारागृहातील महिला कैद्यांना कुलुप तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असून या माध्यमातून एक राेजगाराची संधी या महिलांना मिळणार अाहे. त्याचबराेबर येथे मिळणारे प्रशिक्षणाच्या अाधारे तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्या स्वतःचा व्यवसायही सुरु करु शकणार अाहेत. 

    स्पार्क मिंडा, अशाेक मिंडा ग्रुपच्या वतीने येरवडा महिला कारागृहाच्या साेबतीने अाॅटाेमाेटिव्ह लाॅकसेट सब-अॅसेम्ब्ली उत्पादनाचे युनिट येरवडा कारागृहात बसविण्यात येणार अाहे. या माध्यमातून महिला कैद्यांना एक राेजगाराची संधी मिळणार असून त्याचबराेबर अाॅटाेमाेटिव्ह लाॅक्सचे उत्पादन व फिनिशिंग यासाठी अावश्यक असलेली काैशल्ये अात्मसात करता येणार अाहेत. यासाठी येरवडा कारागृहातील 25 ते 30 महिला कैद्यांची निवड करण्यात अाली अाहे. त्यांना अाॅटाेमाेटिव्ह लाॅकसेटची निर्मिती करण्यासाठी शाॅप फ्लाेअरवर काम करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार अाहे. येथे उत्पादन केले जाणारे कुलुप ग्राहकांसाेबतच अाफ्टर - मार्केटमध्येही विकली जाणार अाहेत. 

   या उपक्रमाविषयी स्पार्क मिंडा, अशाेक मिंडा ग्रुपचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी अशाेक मिंडा म्हणाले, तुरुंगातील कैद्यांचे जीवन सुधारण्यासाठी, तसेच भविष्याच्या दृष्टीने त्यांच्यामध्ये व्यवसायविषयक मूल्ये रुजवण्यासाठी त्यांना मदत करण्याच्या विशेष पद्धतींचा एक भाग अाहे.  स्त्रीला सबळ केल्यास संपूर्ण समाज सबळ हाेऊ शकताे. समाजाचे ऋण फेडण्यासाठी अाम्ही करत असलेल्या छाेट्याश्या प्रयत्नामुळे जेलमधील कैद्यांच्या मानसिकतेत बदल अाणण्यासाठी मदत हाेईल अशी अपेक्षा अाहे. 

Web Title: lock making training will be givan to women prisoner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.