लॉकडाऊन कोणाला परवडणारा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:16 AM2021-03-13T04:16:53+5:302021-03-13T04:16:53+5:30
पुणे : कोरोना रुग्ण वाढत आहेत म्हणून पुन्हा लॉकडाऊन करणे हे कोणालाच परवडणारे नाही़ आजमितीला जे रुग्ण ...
पुणे : कोरोना रुग्ण वाढत आहेत म्हणून पुन्हा लॉकडाऊन करणे हे कोणालाच परवडणारे नाही़ आजमितीला जे रुग्ण वाढत आहेत, त्यापैकी ८० टक्के रुग्ण हे लक्षणेविरहित आहेत़ त्यामुळे कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून, खबरदारी घेण्याबाबत लोकांना जागृत करणे हा चांगला पर्याय आहे़ रुग्ण वाढतात म्हणून लॉकडाऊन हा विषय चर्चेला न घेता, कोरोना रुग्णांपासून इतरांना संसर्ग कसा होणार नाही, याबाबत उपाययोजनांवर चर्चा करणे आवश्यक आहे़
- कौशिक मराठे, कॉटनकिंग
---
कोरोना आपत्तीत प्रारंभी आपण दोन वेळा लॉकडाऊनला सामोरे गेलो असून, यात व्यापाऱ्यांसह सर्वच लोक भरडले गेले आहेत़ पुन्हा लॉकडाऊन कोणालाच परवडणारे नाही़ आजही पहिल्या आर्थिक नुकसानीतून कोणीच सावरलेले नाही़ त्यामुळे लॉकडाऊन व्यतिरिक्त इतर पर्याय व उपाययोजनांवर आपण भर दिला पाहिजे़
- अभय गाडगीळ, पीएनजी़