लॉकडाऊनचा असाही घेतला जात होता गैरफायदा, लाचखोरीचा असा झाला पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 12:22 PM2020-05-03T12:22:33+5:302020-05-03T12:23:23+5:30
एका कंटनेर अडवून ठेवला तर त्यामागे ५ कामगार असतात़ त्यांचा दररोजचा किमान दीड हजार रुपये खर्च गृहीत धरला तरी, आठ दहा दिवसात काही हजार रुपयांचा खर्च होतो़
विवेक भुसे
पुणे : लॉकडाऊन असल्याने सर्व प्रकारच्या वाहतूकीवर बंधन आणण्यात आली होती़ दुसºया लॉकडाऊनमध्ये काही व्यावसायिकांच्या वाहतूकीला परवानगी देण्यात आली. रस्त्यावर वाहने नसल्याने पुणे मुंबई महामार्गावरी अंमृतांजन पुल पाडण्यात आला. त्याचा राडारोडा काढण्याचे काम सुरु आहे़ त्यामुळे मोठ्या अॅक्सलच्या वाहनांना हळू हळू सोडा, असा आदेश देण्यात आला होता. याचा गैरफायदा महामार्ग पोलीस पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सत्यजित अधटराव यांनी लाचखोरीसाठी घेतला. पण, ज्या ट्रॉन्सपोर्ट कंपनीचा हा अॅक्सल कंटेनर होता. ती कंपनी मुंबईची होती. त्यामुळेच लाचखोरीचा हा गोरख धंदा उघडकीस येऊ शकला़
एका कंटनेर अडवून ठेवला तर त्यामागे ५ कामगार असतात़ त्यांचा दररोजचा किमान दीड हजार रुपये खर्च गृहीत धरला तरी, आठ दहा दिवसात काही हजार रुपयांचा खर्च होतो़ शिवाय गाडी रस्त्यावर अडकून पडते ती वेगळीच़ याचा गैरफायदा घेऊन अधटराव याने राजकोटला जाणारा कंटेनर उर्से टोलनाक्याला अडवून ठेवला़ दहा दिवस पुढे जाता येणार नाही, असे म्हणून २० हजार रुपयांची लाच मागितली़ या डायव्हरने ही बाब मुंबईच्या ऑफिसला कळविली़ मुंबई आॅफिसमधील अधिकाºयांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे मुंबई कार्यालय गाठले़ तेथून पुणे कार्यालयात याची माहिती देण्यात आली़ त्यानंतर पुणे कार्यालयातील अधिकाºयांनी या कंटेनरचालकाशी संपर्क साधला. त्याला टोलनाक्यावर जाऊन भेटणे शक्य नव्हते़ त्यामुळे त्याला तेथील एका पुलाखाली बोलविण्यात आले़ तो कंटेनरचे पुढचे तोंड घेऊन तेथे आला़ त्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व समजावून सांगितले़ त्यानंतर त्याने अधटराव याच्याशी संपर्क साधला़ त्यानेही तडजोड करीत १५ हजार रुपये घेण्याचे कबुल केले़ हे सर्व पोलिसांनी रेकॉर्ड केले. त्यानंतर सापळा रचला़ तरीही १५ हजार रुपये घेतल्यावर त्याला संशय आला व पैसे टाकून तो पळून गेला. शेवटी पोलिसांनी त्याला अटक केली़ अधिक तपासासाठी आता त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे़
रस्त्यावर एखादा ट्रक अडवून ठेवला तर कंपनीचा खर्च हाताबाहेर जाऊ लागतो़ त्यात हे ट्रकचालक बाहेरच्या राज्यातील असल्याने थोडे पैसे गेले तरी चालतील, पण ट्रक पुढे जाऊ दे, असे त्यांना आॅफिसमधून सांगितले जाते़ त्याचा महामार्ग सुरक्षा पथकाकडून गैरफायदा घेतला जातो़ हा कंटनेर जरी चेन्नईहून येऊन राजकोटला जात होता़ तरी त्यांचे कार्यालय मुंबईत असल्याने हा प्रकार उघड होऊ शकला़ लॉकडाऊनला आता ४० दिवस पूर्ण झाले आहेत़ त्यातील केवळ एक प्रकरण पुढे आले आहे़ पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर अधीक्षक संजय पाटील, उपअधीक्षक दत्तात्रय भापकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा सापळा यशस्वी केला.