राज्यात पंधरा दिवसांपेक्षा जास्त लॉकडाऊन वाढणार , हॉस्पिटलबाबत तक्रार असेल तर थेट मला सांगा : आरोग्यमंत्री राजेश टोपे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 02:52 PM2021-05-28T14:52:46+5:302021-05-28T17:13:20+5:30

म्युकोरमायकॉसिस चा रुग्णांनी महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत उपचार घ्यावेत लहान मुलांचा लसीकरणाच्याबाबत अद्याप काही धोरण नाही

Lockdown will increase in the state for more than fortnight: Health Minister Rajesh Tope | राज्यात पंधरा दिवसांपेक्षा जास्त लॉकडाऊन वाढणार , हॉस्पिटलबाबत तक्रार असेल तर थेट मला सांगा : आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात पंधरा दिवसांपेक्षा जास्त लॉकडाऊन वाढणार , हॉस्पिटलबाबत तक्रार असेल तर थेट मला सांगा : आरोग्यमंत्री राजेश टोपे

Next

राज्यात पंधरा दिवसांपेक्षा जास्त काळासाठी लॉकडाऊन वाढवला जाणार आहे, १ जून रोजी नवे नियम लागू केले जातील. त्यासंदर्भातील पत्रक आणि नियमावली राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर करतील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोप यांनी दिली आहे. राज्यात गर्दीचे सर्व कार्यक्रम बंदच राहणार असून ज्या जिल्ह्यात प्रमाण कमी झालं आहे तिथं काही प्रमाणात शिथिलता देण्यात येईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

कोरोना उपचारांचा प्रोटोकॉल पाळला गेला नाही तर काही समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे यासंबधीच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जावे असा आमचा प्रयत्न आहे असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांंनी सांगितले. आणखी 15 दिवसांचा लॉकडाऊन गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. 

टोपे त्यांच्या साखर कारखान्याच्या कामासाठी साखर संकुलमध्ये आले होते. कोरोना होऊन झाल्यानंतर आता म्यूकरमायकोसिससारखा आजार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता टोपे म्हणाले, "कोरोनावरील उपचारांचे काही नियम ठरवून दिले आहेत. त्यानुसार रूग्णाच्या कोणत्या स्थितीत कोणती औषधे द्यायची हे निश्चित आहे. रूग्ण दाखल झाल्यावर पहिल्या दिवशी, काय, दुसऱ्या दिवशी काय इतका बारकाईने यात विचार केला गेला आहे. याच पद्धतीने उपचार व्हावेत यासाठी डॉक्टरांना वारंवार सांगण्यात येत आहे. उपचारांची औषधे, त्याचे प्रमाण वगैरेंमध्ये फरक पडत असेल तर कदाचित त्याचे परिणाम होऊ शकतात", असे मत टोपे यांनी व्यक्त केले.  "म्युकरमायक्रोसिसच्या रुग्णांनी महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू असलेल्या रुग्णालयात उपचार घ्यावेत.असे 131 हॉस्पिटल आहेत, इथं उपचार मोफत आहेत" असं टोपे म्हणाले. 

"इंजेक्शनचा तुटवडा आहे, त्यामुळे खासगी हॉस्पिटलमध्ये ते वेळेवर मिळतं नाहीत. या इंजेक्शनचा सर्व कंट्रोल हा केंद्राकडे आहे,  केंद्र महाराष्ट्राच्या झोळीत जितके इंजेक्शन देत त्याप्रमाणे वाटप होतं. इंजेक्शन उपलब्ध होण्यात अडचणी असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मानसिक त्रास होतो", असंही टोपे यांनी स्पष्ट केले. नितीन गडकरी यांचं अभिनंदन करेन, वर्ध्यात इंजेक्शनच उत्पादन सुरु होतोय, ते इंजेक्शन महाराष्ट्रातला मिळतील असा टोपे म्हणाले. 

लसीकरणमोहीमे बद्दल बोलताना "ग्लोबल टेंडर काढलं आहे, पण त्यात काही तांत्रिक मुद्दे उपस्थितीत झालेत, ते दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण केंद्राने यात हस्तक्षेप केला पाहिजे, हा सर्व विषय केंद्राच्या अखत्यारीत आहे. लसीकरणाला लागणारा निधी केव्हाच आम्ही तयार ठेवला आहे, एका चेक ने सर्व पैसे द्यायला तयार आहोत हे वारंवार सांगतोय. फक्त आता केंद्राने लस द्यायला हवी. तसेच लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भात अजून कोणत्याही देशात धोरण ठरलेलं नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

कोरोनानंतर ऊच्च रक्तदाबाचा विळखा अनेकांना पडलेला दिसतो. याचे कारण बदलेली जीवनशैली हे असल्याचे टोपे म्हणाले. मुंबईसह अनेक शहरांमध्ये या विकाराने ग्रिसलेल्यांची संख्या वाढत आहे. जीवनशैली बदलणे, ताण कमी करणे हाच त्यावरचा ऊपाय आहे असे त्यांनी सांगितले. मात्र, तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त बाधा होईल असं सांगितलं जात आहे. आम्ही त्याची सगळी तयारी करतोय. असंही टोपे म्हणाले. 

"अधिवेशन आपण नेहमी घेत आलोय, सर्व विषयावर चर्चा करण्याची तयारी आहे.आम्ही लोकशाही मानणारे लोक आहेत, जे वैधानिक विषय आहेत ते आम्ही घेणारच .आम्हाला लोकांची काळजी आहे, लोकप्रतिनिधींचीही काळजी आहे.फक्त आम्ही याचा शास्त्रीय पद्धतीने विचार करतोय"असे टोपे म्हणले. दरम्यान प्रत्येक बिल चेक करा असे आदेश देखील त्यांनी दिले आहेत. हॉस्पिटल बाबत तक्रार असेल तर थेट माझ्याकडे तक्रार करा असा देखील टोपेंनी स्पष्ट केलं आहे. 

Web Title: Lockdown will increase in the state for more than fortnight: Health Minister Rajesh Tope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.