कुलूप तोडून दागिने लंपास

By admin | Published: April 25, 2017 04:00 AM2017-04-25T04:00:05+5:302017-04-25T04:00:05+5:30

राजगुरुनगर येथे चोरट्यांनी बंद फ्लॅटचे कुलूप तोडून फ्लॅटमध्ये कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे १ लाख ६५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले.

Locks off the lock and jewelry | कुलूप तोडून दागिने लंपास

कुलूप तोडून दागिने लंपास

Next

दावडी : राजगुरुनगर येथे चोरट्यांनी बंद फ्लॅटचे कुलूप तोडून फ्लॅटमध्ये कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे १ लाख ६५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : तिन्हेवाडी रोड येथील विघ्नहर कॉलनी फ्लॅट क्रमांक १२मध्ये नंदा विश्वनाथ वायदंडे राहतात. त्या बाहेरगावी गेल्या होत्या. दि.२३ रोजी रात्रीच्या वेळी चोरट्यांनी फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप व कडीकोयंडा तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला.
कपाटात ठेवलेली दीड तोळा वजनाची सोन्याची साखळी, तीन तोळ्यांचे मणीमंगळसूत्र, एक नेकलेस, अंगठी, कर्ण वेल, बदाम, लहान मुलांच्या चांदीच्या बांगड्या असा १ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला.
वायदंडे सायंकाळी फ्लॅटकडे आले असता, त्यांना दरवाजाचे कुलूप व कडी -कोयंडा तुटलेले त्यांच्या निर्देशनास येऊन कपाटातील दागिने गायब झाल्याचे लक्षात आले. पुढील तपास खेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश म्हस्के करत आहे.

Web Title: Locks off the lock and jewelry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.