जगातील सर्वात शक्तिशाली रेल्वे इंजीनसाठी ‘अजनी’त लोको शेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:15 AM2021-05-05T04:15:44+5:302021-05-05T04:15:44+5:30
पुणे - जगातील सर्वात शक्तिशाली रेल्वे इंजिन म्हणून ओळखले जाणाऱ्या वॅग १२ च्या देखभाल-दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेच्या ...
पुणे - जगातील सर्वात शक्तिशाली रेल्वे इंजिन म्हणून ओळखले जाणाऱ्या वॅग १२ च्या देखभाल-दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेच्या अजनी स्थानकाजवळ लोको शेड उभारला जाणार आहे. हा देशातील दुसरा लोको शेड असेल. १८,५ एकरच्या जागेत हा शेड उभारला जाईल. याची क्षमता २५० इंजीनची असून, यासाठी १५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. जून २०२२ पासून शेडच्या कामास सुरुवात होईल.
रेल्वे मंत्रालय व अल्सटॉम कंपनीने मिळवून हे इंजीन मधेपुरा येथील इंजीन कारखान्यात तयार केले आहे. आतापर्यंत जवळपास १०० इंजीन तयार झाले आहे. तयार झालेल्या इंजीनच्या देखभालीसाठी लोको शेड महत्त्वाचा आहे. पहिला शेड उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे होणार आहे, तर दुसरा नागपूर विभागातील अजनी स्थानकाजवळ होणार आहे.
- काय आहेत याची वैशिष्ट्ये -
वॅग १२ हे १२ हजार अश्व शक्तीचे इंजीन आहे. हे जगातील सर्वांत जास्त शक्तिशाली इंजीन मानले जाते. आतापर्यंत भारतात
९ हजार अश्वशक्तीचे इंजीन शक्तिशाली इंजीन ठरले होते. याचे वजन ६ हजार टन इतके असून ते १२० किमी प्रति तास गतीने धावते. याचे अक्सलरेशन जास्त असल्यामुळे गाडी काही सेकंदातच वेग घेऊ शकते.
- याचा फायदा काय -
भारतीय रेल्वेत सध्या माल वाहतुकीवर लक्ष केंद्रित करण्यात आले. मालगाड्याची गती वाढविणे तसेच डबल डेकर मालगाडी चालविणे यावर भर दिला जात आहे. शिवाय मालवाहतुकीसाठी स्वतंत्र कॉरिडोर करण्याचे काम सुरू आहे. वॅग १२ मुळे माल वाहतूक अधिक गतीने होईल. शिवाय यासाठी अतिरिक्त इंजीनची गरज भासणार नाही. त्यामुळे डिझेलमध्ये देखील बचत होईल.
- पुण्यात दाखल होणार -
या इंजीनच्या आतील रचनेत काही तांत्रिक बदल करण्यात आले आहे.त्यामुळे ते
चालविण्यासाठी आतापर्यंत पुणे विभागातील जवळपास ३०० चालकांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे.
------------
वॅग १२ मुळे माल वाहतुकीची गती व क्षमता वाढेल. नवा शेड सध्याचा शेडचे विस्तार असेल. जून २०२२ पासून याच्या प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल.
- कृष्णात पाटील, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, नागपूर