लोहगाव विमानतळ एप्रिल-मे मध्ये १४ दिवस राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:00 AM2021-02-05T05:00:29+5:302021-02-05T05:00:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लोहगाव विमानतळावरील धावपट्टीचे रिसरफेन्सिंगचे काम करायचे असल्याने एप्रिल आणि मे २०२१ मध्ये १४ दिवस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लोहगाव विमानतळावरील धावपट्टीचे रिसरफेन्सिंगचे काम करायचे असल्याने एप्रिल आणि मे २०२१ मध्ये १४ दिवस विमानसेवा बंद राहणार असल्याची माहिती पुणे विमानतळ प्राधिकरणाने दिली आहे. सध्या केवळ दिवसाची विमानसेवा सुरु आहेत. रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत लोहगाव विमानतळावरून उड्डाणे बंद आहेत.
इंडियन एअर फोर्सने याबाबत विमान प्राधिकरणाने माहिती दिली आहे. पुणे विमानतळ हा संरक्षण खात्याच्या मालकीचा जागेवर आहे. भारतीय हवाई दलासाठी प्रामुख्याने या विमानतळाचा वापर केला जातो.
गेल्या वर्षी २६ ऑक्टोबरपासून विमानतळावरील धावपट्टी दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. पुणे येथील लोहगाव विमानतळावर २६ एप्रिल ते ९ मे २०२१ असे १४ दिवस धावपट्टीचे काम करणार आहे. त्यामुळे पुणे येथील विमानतळावरील विमानसेवा बंद राहणार असल्याचे पुणे विमानतळ प्राधिकरणाने सांगितले. त्यामुळे आगाऊ विमान तिकीट काढण्यापूर्वी पुणे लोहगाव विमानतळ बंद असलेल्या तारखा लक्षात घ्याव्यात.