लोहगावकरांचा बहिष्कार कायम

By admin | Published: May 13, 2017 04:50 AM2017-05-13T04:50:46+5:302017-05-13T04:50:46+5:30

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत लोहगावमधून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.

Lohgaonkar's boycott | लोहगावकरांचा बहिष्कार कायम

लोहगावकरांचा बहिष्कार कायम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
येरवडा : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत लोहगावमधून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे लोहगावमधील प्रमुख राजकीय गटांनी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार यशस्वी झाला.
महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात येणाऱ्या ३४ गावांमध्ये लोहगावचाही समावेश आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारचा (दि. १२) शेवटचा दिवस होता. जर ग्रामपंचायत निवडणूक झाली असती, तर अस्तित्वात येणाऱ्या सदस्यांचा कार्यकाल १५-२० दिवसांतच संपुष्टात येणार होता. त्यामुळे आमदार जगदीश मुळीक यांनी ज्येष्ठ नेते प्रताप खांदवे व पांडुरंग खेसे यांच्यासह राजकीय व्यक्तींची चर्चा केली. त्या वेळी बहिष्काराचा निर्णय घेण्यात आला.

Web Title: Lohgaonkar's boycott

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.