लोहियानगर येथील सराईत गुंड तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 05:31 PM2018-07-19T17:31:36+5:302018-07-19T17:34:59+5:30
पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी आगामी काळात साजऱ्या होणाऱ्या उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये व आपले गुन्हेगारी वर्चस्व निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांचा नायनाट करण्यासाठी त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
पुणे : आगामी सण व उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलिसांनी कारवाईस सुरुवात केली आहे़. लोहियानगर येथील सराईत गुंड शतुल प्रभाकर नाडे (वय २९, रा़ लोहियानगर) याला पुणे शहर व जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे़.
पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी आगामी काळात साजऱ्या होणाऱ्या उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये व आपले गुन्हेगारी वर्चस्व निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांचा नायनाट करण्यासाठी त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
खडक पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार शतुल नाडे याच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात खुनाचा १ गुन्हा आणि चंदननगर पोलीस ठाण्यात पिस्तुल बाळगल्याप्रकरणी १ गुन्हा दाखल आहे़. तसेच खडक पोलीस ठाण्यात गर्दी जमवून मारामारी केल्याचे २ गुन्हे दाखल आहेत़. २०१५ मध्ये प्रतिबंधक कारवाई करण्यात आल्यानंतरही त्याच्यात काहीही सुधारणा न झाल्याने त्यामुळे खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार करुन पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांच्याकडे पाठविला़. तेली यांनी त्याला मान्यता देऊन त्याला एक वर्षांसाठी तडीपार केले आहे़.