महायुतीची मोठी तयारी! राज ठाकरे-नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार, शिवाजी पार्कवर सभा होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 04:04 PM2024-04-17T16:04:48+5:302024-04-17T16:08:45+5:30
Raj Thackeray Narendra Modi : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुढी पाडवा मेळाव्यादिवशी पाठिंबा दिल्याचे जाहीर केले.
Raj Thackeray Narendra Modi : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुढी पाडवा मेळाव्यादिवशी पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली. दरम्यान, आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकाच मंचावर येणार असल्याची माहिती अमित ठाकरे यांनी आज पुण्यात पत्रकारांसोबत अनौपचारिक संवाद साधताना दिली.
राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यावेळी कार्यकर्त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन केले होते. त्यावेळी लवकरच प्रचारसभा घेणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, आज अमित ठाकरे यांनीही याबाबत माहिती दिली.
मनसे नेते अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आले आहेत. पुण्यात अमित ठाकरे आज प्रभाग निहाय बैठका घेत आहेत. महायुतीला दिलेल्या पाठिंबाबाबत ते पदाधिकाऱ्यांसोबत बोलत आहेत. तर दुसरीकडे मनसेतील काही पदाधिकाऱ्यांनी महायुतीला पाठिंबाबात नाराजी व्यक्त केली आहे. यावर आता मनसेने पक्षाचे काम करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
पुण्यात वसंत मोरे यांनी मनसेला राजीनामा दिला असून त्यांनी आता वंचितकडून लोकसभेची निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. यावरुन आता मनसे नेते अमित ठाकरे यांनी वसंत मोरे यांच्यावर टीका केली आहे.
राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा
मनसे प्रमुख राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते. गुढी पाडवा मेळाव्यादिवशी राज ठाकरेंनी मोठी घोषणा केली. राज ठाकरेंनी आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांना तयारी करण्याचे आवाहनदेखील केले.
राज ठाकरेंच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.