"माझे मनभेद झाले नाहीत, साहेब नाराज आहेत, पण..."; वसंत मोरे राज ठाकरेंना भेटणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 04:11 PM2024-04-13T16:11:27+5:302024-04-13T16:14:06+5:30

Loksabha Election 2024: पुणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. त्यात वसंत मोरे यांनी मनसेच्या पाठिंब्यासाठी राज ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचं विधान केले आहे.

Lok Sabha Election 2024 - Will try to meet Raj Thackeray for election support - Vasant More | "माझे मनभेद झाले नाहीत, साहेब नाराज आहेत, पण..."; वसंत मोरे राज ठाकरेंना भेटणार?

"माझे मनभेद झाले नाहीत, साहेब नाराज आहेत, पण..."; वसंत मोरे राज ठाकरेंना भेटणार?

पुणे - Vasant More on Raj Thackeray ( Marathi News ) मी २५ वर्ष राजसाहेबांसोबत आहे, त्यामुळे मी त्यांना भेटण्याचा प्रयत्न करेन. महाराष्ट्र सैनिकही त्यातून मार्ग काढतील. वेळेनुसार पुढे गोष्टी घडतील, अजून प्रचाराला सुरुवात नाही. ३० तारखेनंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल. त्यानंतर रणनीती ठरल्या जातील असं म्हणत वसंत मोरे यांनी मनसेचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करू असं विधान केले आहे.

वसंत मोरे म्हणाले की, राज ठाकरेंनी मदत केली तर चांगलेच आहे. माझे राज ठाकरेंचे जुने संबंध आहेत. मी २५ वर्ष काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधण्याचा विचार करू. विचारांशी फारकत घेतली आहे. माणसाचे मतभेद होतात, मनभेद नाहीत. माझे मनभेद झाले नाहीत तर मी विचारांशी फारकत घेतली आहे. जसजसं घोडेमैदान जवळ येईल तसतशी रणनीती आखली जाईल. साहेब पाठिंबा देतील की नाही हे मी सांगू शकत नाही. साहेब कदाचित नाराज आहेत, पाहू प्रयत्न करू असं वसंत मोरे यांनी म्हटलं. 

तसेच मनसेच्या स्थानिक नेत्यांमध्ये स्वाभिमान असेल तर त्यांनी बोलायला हवं, स्वत: राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला असेल तर महायुतीच्या मेळाव्यात फोटो का लावला नाही याचा जाब विचारणे गरजेचे आहे. प्रत्येक गोष्टीत साहेब बोलत नाही. या लोकांनीही बोललं पाहिजे. पाठिंब्यासाठी मी साहेबांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेन. शेवटच्या क्षणापर्यंत बोलायचा प्रयत्न करेन, शेवटी राज ठाकरेंचा निर्णय मनसेत अंतिम असतो. साहेबांनी ठरवलेच असेल तर ते भेट देणार नाहीत. पण भेटीचा प्रयत्न मी १०० टक्के करेन असंही वसंत मोरेंनी सांगितले.

दरम्यान, पुण्यातील इतर उमेदवार आता रणांगणात उतरलेत. मी कोरोना काळापासून पुणेकरांच्या सेवेत आहे. ४ वर्षापासून मी सेवा करतोय. १५-२० दिवसांत इतर उमेदवार फिरतायेत. आतापर्यंत कुणी उन्हात नव्हते त्यामुळे आता त्यांना फिरू द्या. कुणीची बी, सी टीम हे जनता ठरवतं. एखाद्याच्या स्वार्थासाठी बी टीम, सी टीम अशी टीका केली जाते. वंचितला बी टीम म्हणणाऱ्यांची पात्रता काय असा सवालही वसंत मोरेंनी विचारला. 

पुण्यात अण्णा, भाऊ नव्हे तर तात्याच खासदार

युती आणि आघाडीच्या प्रचारासाठी येणाऱ्यांनी कदाचित वसंत मोरेंना खासदार करायचं हे ठरवलं आहे. जो येतोय तो वसंत मोरेंवर बोलतोय. वसंत मोरे हा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे. त्याच्यावर बोलण्या इतपत हे लोक आता घाबरलेत. भविष्यात पुण्यात अण्णा आणि भाऊचं नाही तात्याचे राजकारण चालेल. पुण्याचा खासदार तात्याच झालेला असेल असाही विश्वास वसंत मोरे यांनी व्यक्त केला.
 

Web Title: Lok Sabha Election 2024 - Will try to meet Raj Thackeray for election support - Vasant More

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.