गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक की भाऊसाहेब रंगारी हा वाद मूर्खपणाचा - राज ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 12:51 AM2017-08-20T00:51:28+5:302017-08-20T00:51:42+5:30
सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक की भाऊसाहेब रंगारी, यावरुन पुण्यात सुरू असलेला हा वाद म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
पुणे : सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक की भाऊसाहेब रंगारी, यावरुन पुण्यात सुरू असलेला हा वाद म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. आतापर्यंत थोर पुरूषांना जातीत विभागले जात होते, आता देवांचीही विभागणी केली जात आहे असे ते म्हणाले.
पक्ष संघटनेच्या कामासाठी ठाकरे दोन दिवस पुण्याच्या दौºयावर आहेत. पत्रकारांशी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर मतप्रदर्शन केले. प्रत्येक वेळी याप्रकारे संवाद साधणे शक्य होत नाही. वर्तमानपत्र, मासिक काढणे आता शक्य नाही. तसे वातावरण राहिलेले नाही. आता सोशल मिडियावर अॅक्टिव्ह होणार आहे. या पेजवर व्यंगचित्रांपासून ताज्या घडामोडींवरील भाष्यापर्यंत सर्व असेल असे त्यांनी सांगितले.
परप्रांतिय लोक नोकºया घेतात या माझ्या म्हणण्याकडे गांभीर्याने लक्ष द्या, कोणालाही कसलेही आरक्षण मागण्याची वेळच येणार नाही अशी टिप्पणीही ठाकरे यांनी केली.