लोकमान्य टिळक दहशतवादाचे जनक?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 04:01 AM2018-05-12T04:01:06+5:302018-05-12T04:01:06+5:30
राजस्थानमधील मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने अकलेचे तारे तोडले आहेत.
पुणे : राजस्थानमधील मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने अकलेचे तारे तोडले आहेत. इंग्रजी माध्यमातील आठव्या इयत्तेच्या समाजशास्त्राच्या संदर्भ पुस्तिकेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा ‘दहशतवादाचे जनक’ असा आक्षेपार्ह उल्लेख केला आहे.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी देशात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. ब्रिटिश सत्तेविरुद्ध सर्वसामान्यांचे स्फुल्लिंग चेतविणारे ते ‘असंतोषाचे जनक’ होते. मात्र याचा चुकीचा अर्थ लावून राजस्थान सरकारच्या शिक्षण विभागाने लोकमान्यांना ‘दहशतवादाचे जनक’ असे संबोधले आहे. या अक्षम्य व आक्षेपार्ह चुकीबद्दल राजस्थान सरकारला समज देऊन तो मजकूर तातडीने काढून टाकायला सांगा, अशी मागणी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे केली आहे.
या अक्षम्य व आक्षेपार्ह चुकीबद्दल राजस्थान सरकारला समज देऊन तो मजकूर तातडीने काढून टाकायला सांगा, अशी मागणी अनेकांनी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याबाबत लिहावे व राज्य सरकारच्या वतीने या गंभीर चुकीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करावी, असेही महापौरांना सांगण्यात आले.