लोकमत इफेक्ट .... पाबळचे ग्रामीण रुग्णालय अखेर कोरोना रुग्णांसाठी होणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:09 AM2021-04-12T04:09:26+5:302021-04-12T04:09:26+5:30
येथील ग्रामीण रुग्णालय लवकर सुरू करण्याची मागणी शिरूरच्या पाबळ, धामारी, खैरेनगर, कान्हूर मेसाई आदी भागातील नागरिक करत होते. गृहमंत्री ...
येथील ग्रामीण रुग्णालय लवकर सुरू करण्याची मागणी शिरूरच्या पाबळ, धामारी, खैरेनगर, कान्हूर मेसाई आदी भागातील नागरिक करत होते. गृहमंत्री दिलीपराव वळसे यांच्या प्रयत्नातून पाबळ येथे ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचं काम पूर्ण होवून सहा महिने झाले आहे. याबाबत ‘लोकमत’ने पाठपुरावा करत याबाबतच्या बातम्या छापल्या होत्या. सध्या या भागातील रुग्णांना मलठण आवसरी, खेड, या ठिकाणी उपचारासाठी जावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी आमदार दिलीपराव वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे, शिरूर हवेली मतदारसंघाचे आमदार अशोकराव पवार, त्याचबरोबर शासकीय आधिकारी यांनी येथे भेटी दिल्या होत्या व लवकरच रुग्णालय सुरू करणार असल्याचे सांगितले होते. आज संपूर्ण पाहणी करत दोन दिवसांत येथील कोविड सेंटर सुरू करण्यात येणार असून येथील रुग्णांसाठी जेवण व विविध सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रांत अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी यावेळी सांगितले.
पाबळ येथे उभारलेले ग्रामीण रुग्णालयांची पहाणी करतांना प्रांतअधिकारी संतोषकुमार देशमुख, सविता बगाटे, मारुती शेळके.