लोकमत उडाण करिअर मार्गदर्शन व्याख्यान उद्या
By admin | Published: April 26, 2015 01:24 AM2015-04-26T01:24:49+5:302015-04-26T01:24:49+5:30
बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे काय? हा मोठा प्रश्न विद्यार्थी व पालकांच्या समोर उभा राहतो.
पुणे : बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे काय? हा मोठा प्रश्न विद्यार्थी व पालकांच्या समोर उभा राहतो. परंतु, इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, नर्सिंग या नेहमीच्या अभ्यासक्रमांशिवाय आणखी कोणत्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन आपले करिअर उज्ज्वल करता येऊ शकते याबाबतचे योग्य मार्गदर्शन येत्या २७ एप्रिल रोजी ‘लोकमत उडाण करिअर मार्गदर्शन’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांना दिले जाणार आहे.
लोकमत आणि मुंबई येथील नर्सी मोन्जी इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने २७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता कोथरूड येथील मयूर कॉलनी परिसरातील बालशिक्षण मंदिरच्या एमईएस सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. केवळ ग्रामीण भागातीलच नाही, तर शहरी भागातील विद्यार्थी व पालकांचा सुद्धा करिअर निवडताना गोंधळ
उडतो.
त्यामुळे बारावीमध्ये प्रवेश घेतलेल्या व बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना या कार्यक्रमाचा लाभ घेता येणार आहे. इंजिनिअरिंग, फार्मसी, मॅनेजमेंट, सी.ए., पायलट, मेडिकल, फायनान्स, टुरिझम त्याचबरोबर नव्याने सुरू झालेल्या सॉफ्ट स्किल अभ्यासक्रमांविषयी व उद्योग क्षेत्रात निर्माण होणाऱ्या विविध रोजगारांविषयावर मुंबईचे प्रा. मनोज अनोकर, प्रा. योगेश कुलकर्णी आणि कॅप्टन अभिषेक मदिराला या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षमता ओळखून योग्य करिअरची निवड करणे आवश्यक असते. बारावीनंतर विद्यार्थ्याच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळते. त्यामुळे बारावीनंतर प्रत्येक विद्यार्थ्याने योग्य करिअरची निवड करणे गरजेचे असते. त्यामुळेच ‘लोकमत’ने ही संधी उपलब्ध करून दिली आहे.
करिअर निवडण्यापूर्वी कोणत्या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे, अशा पालक व विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मिळणार आहेत. त्यामुळे पुणे शहर व परिसरातील विद्यार्थ्यांनी या संधीचा अधिकाधिक फायदा घ्यावा. हा कार्यक्रम विद्यार्थी व पालकांसाठी विनामूल्य असून, अधिक माहितीसाठी ९९२१२७४७४७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
बारावीची परीक्षा
दिली, पुढे काय ?
४इंजिनिअरिंग, मेडिकल की आयआयटी, कुठे प्रवेश घ्यावा, या प्रश्नांची योग्य उत्तरे जाणून घेण्याची संधी.
४हुशार, सर्वसाधारण अशा सर्व विद्यार्थ्यांना करिअर निवडण्यासाठी मार्गदर्शन.