लोकमत इम्पॅक्ट : हिरकणी कक्षासाठी मनसेचे 'टाळा ठोको' आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 04:29 PM2019-01-29T16:29:56+5:302019-01-29T16:31:07+5:30

हिरकणी कक्षामध्ये बसून महिला कर्मचारी बिलांची आणि दैनंदिन प्रशासकीय कामे करत असल्याचे लोकमत ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आणले. 

Lokmat Impact: 'lock' for the Hirakani women room by mns | लोकमत इम्पॅक्ट : हिरकणी कक्षासाठी मनसेचे 'टाळा ठोको' आंदोलन

लोकमत इम्पॅक्ट : हिरकणी कक्षासाठी मनसेचे 'टाळा ठोको' आंदोलन

Next
ठळक मुद्देस्टिंग ऑपरेशनद्वारे वस्तुस्थिती उघडकीस आणताच प्रशासनाची धावपळ 

पुणे : महिला कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी महापालिकेमध्ये सुरु करण्यात आलेल्या हिरकणी कक्षाचा वापर कार्यालयीन कामासाठी होत असल्याचे 'लोकमत'ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून उघडकीस आणल्यानंतर प्रशासनावर टीका होऊ लागली आहे. असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी महापालिकेमध्ये आंदोलन केले. महिला कार्यकर्त्यांनी हिरकणी कक्षाला साखळी आणि कुलूप लावण्यात आले. या कक्षातील अन्य कामकाज बंद करण्याची मागणी केली. 
या कक्षामध्ये बसून महिला कर्मचारी बिलांची आणि दैनंदिन प्रशासकीय कामे करत असल्याचे लोकमत ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आणले. या बातमीची दखल घेत मनसेच्या शहर महिलाध्यक्षा रुपाली पाटील यांनी लावण्या शिंदे, वंदना साळवी, ज्योती कोंडे, नीता पालवे, अनुराधा घुगे, मनीषा कावेडीया, सुरेखा होले आदी महिला कार्यकर्त्यांसह पालिकेमध्ये आंदोलन केले. यावेळी रुपाली पाटील या स्वत:च्या मुलाला कांगारू बॅग मध्ये अडकवून आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. हातामध्ये निषेधाच्या पाट्या घेऊन प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हा कक्ष महिलांसाठीच वापरण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांना देण्यात आले. 
सार्वजनिक ठिकाणी अनेक महिलांना मुलांना स्तनपान करण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. महिलांची कुचंबणा आणि बाळाचे हाल होऊ नयेत यासाठी  ब्रेस्ट फिडींग प्रमोशन नेटवर्क कौन्सिलच्या सूचनेवरून शासनाच्या विविध विभागांमध्ये हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेमध्येही हा कक्ष सुरु करण्याची मागणी होत होती. 'लोकमत' ने याबाबत वारंवार पाठपुरावा केला होता. सरतेशेवटी महापालिकेमध्ये हा कक्ष सुरु करण्यात आला. हा कक्ष सर्वांसाठी खुला करण्यात यावा याकरिता काही राजकीय पक्षांनी आंदोलनही केले होते. 
हिरकणी कक्ष सुरू करण्यात आल्यानंतर येथे रंगरंगोटी करुन बेड, खेळणी, रंगीत मॅट बसविण्यात आले. हा कक्ष जेव्हा सुरु झाला तेव्हा दोन महिला  अटेंडन्ट ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, याठिकाणी कार्यालयीन कामकाज करण्यात येत होते. महिलांच्या कक्षामध्ये महिलाच फाईलींचे ढीग घेऊन काम करीत असल्याचे चित्र होते. स्तनदा मातांसाठी सुरू केलेल्या या कक्षाचा वापर जागृती अभावी होत नाही. 
====
महापालिकेच्या प्रशासनाने हिरकणी कक्षाच्या उद्देशाला हरताळ फासला आहे. 'लोकमत' ने याबाबत वस्तुस्थिती उजेडात आणून महिलांच्या महत्वाच्या प्रश्नाला वाचा फोडली आहे. मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून हा कक्ष केवळ महिलांच्या वापरासाठीच उपलब्ध करावा अशी मागणी केली आहे. 
- रुपाली पाटील, शहराध्यक्षा, मनसे महिला शाखा

Web Title: Lokmat Impact: 'lock' for the Hirakani women room by mns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.