लोकमत इम्पॅक्ट : नदी पात्रातील राडारोडा रोखण्यासाठी ‘गस्ती पथक’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 12:08 PM2019-06-04T12:08:17+5:302019-06-04T12:17:07+5:30

नदी पात्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर राडारोडा टाकला जात असून पावसाळ्यात त्यामुळे पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

Lokmat Impact: ' security squad ' to prevent radar in river areas | लोकमत इम्पॅक्ट : नदी पात्रातील राडारोडा रोखण्यासाठी ‘गस्ती पथक’

लोकमत इम्पॅक्ट : नदी पात्रातील राडारोडा रोखण्यासाठी ‘गस्ती पथक’

googlenewsNext
ठळक मुद्देदंडात्मक कारवाई करणार : पालिकेच्या पाच झोनसाठी पाच स्वतंत्र पथके  पालिका आयुक्तांकडून शहरातील नद्यांची पाहणी सध्या सुरु

 पुणे : शहरातील मुळा-मुठा नद्यांसह अन्य नद्यांचे पात्र दिवसेंदिवस आकसत चालले असून राडारोडा आणि भराव टाकून जागा लाटण्याचेही प्रकार घडत आहेत. नदीपात्रामध्ये राडारोडा टाकण्यास प्रतिबंध बसावा याकरिता पालिका आयुक्त सौरभ राव यांनी परिपत्रक काढून गस्ती पथक नेमण्याचे आदेश दिले आहेत. क्षेत्रिय कार्यालय स्तरावरील पथकांसोबतच सुरक्षा विभागाची ५५ कर्मचाऱ्यांची पाच पथके नेमण्यात येणार आहेत. 
नदी पात्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर राडारोडा टाकला जात असून पावसाळ्यात त्यामुळे पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यासोबतच नदीपात्राची शासकीय जागा लँड माफियांच्या घशात जाण्याची शक्यता आहे. याबाबत पालिकेकडे तक्रारी येत असतात. पालिका आयुक्तांकडून शहरातील नद्यांची पाहणी सध्या सुरु आहे. रिव्हर वॉकच्या माध्यमातून अधिकारी व पर्यावरण प्रेमी नागरिकांसोबत आयुक्त नदीपात्रांची सध्या पाहणी करीत आहेत. परंतू, उपनगरांमध्ये बºयाच ठिकाणी नदीपात्रामध्ये राडारोडा टाकून पात्रात भराव टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. बºयाचदा सर्वसामान्यांकडूनही राडारोडा नदीपात्रात टाकला जातो. हे प्रकार रात्रीच्या वेळी गुपचूप केले जातात. 
हे प्रकार बंद करण्यासाठी क्षेत्रिय कार्यालय स्तरावर पथके कार्यान्वित केली जाणार आहेत. तसेच महापालिकेच्या सुरक्षा विभागानेही गस्ती पथक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या क्षेत्रिय कार्यालय स्तरावर राडारोडा टाकणाºयांवर कारवाई केली जाते. आतापर्यंत अशा प्रकरची १३ वाहने जप्त करुन त्यांच्याकडून दंड वसुली करण्यात आलेली आहे. दंड वसुलीनंतर वाहन सोडून दिले जाते. सुरक्षा विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले, की ५५ कर्मचाºयांची पाच गस्ती पथके तयार केली जाणार आहेत. पालिकेच्या पाच झोनसाठी पाच पथके आणि त्यांना वाहन पुरवले जाणार आहे. या प्रत्येक पथकावर जमादारांचे नियंत्रण राहणार आहे. क्षेत्रिय कार्यालयांसोबत समन्वय साधून गस्त घालण्यात येणार आहे. यासोबतच क्षत्रिय कार्यालयांकडून प्रभावित भागांची यादी घेऊन त्यानुसार कारवाई केली जाणार आहे. 

Web Title: Lokmat Impact: ' security squad ' to prevent radar in river areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.