लोकमत महामॅरेथॉन : प्रोमो रनला उत्स्फूर्त प्रतिसाद, धावपटूंमध्ये उत्सुकता, रविवारी रंगीत तालीम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 01:13 AM2019-02-09T01:13:01+5:302019-02-09T01:13:04+5:30

‘लोकमत महामॅरेथॉन’च्या रविवारी (दि. १०) होणाऱ्या प्रोमो रनबाबत धावपटू तसेच सामन्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण आहे.

Lokmat Mahamerathon: Promotional response to promo run | लोकमत महामॅरेथॉन : प्रोमो रनला उत्स्फूर्त प्रतिसाद, धावपटूंमध्ये उत्सुकता, रविवारी रंगीत तालीम

लोकमत महामॅरेथॉन : प्रोमो रनला उत्स्फूर्त प्रतिसाद, धावपटूंमध्ये उत्सुकता, रविवारी रंगीत तालीम

googlenewsNext

पुणे - ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या रविवारी (दि. १०) होणाऱ्या प्रोमो रनबाबत धावपटू तसेच सामन्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण आहे. यात सहभागी होण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच जिल्ह्यातील सर्व वयोगटांतील तसेच विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे.

व्हीटीपी रिअ‍ॅल्टी प्रस्तुत आॅक्सिरिचच्या सहयोगाने आणि बालेवाडी येथील सीएम इंटरनॅशनल स्कूलच्या सहकार्याने ‘लोकमत महामॅरेथॉन’ आयोजित केली आहे. येत्या १७ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजता म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडासंकुलापासून या शर्यतीचा थरार रंगणार आहे. तत्पूर्वी, येत्या रविवारी मुख्य शर्यतीच्या ठिकाणी म्हणजेच म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती संकुलापासून प्रोमो रनला प्रारंभ होणार आहे. प्रोमो रनमध्ये ५ आणि १० किलोमीटर गटांचा समावेश असेल. यामध्ये सहभागी होण्यासाठीही सर्व स्तरांतून मोठ्या प्रमाणात नोंदणी होत आहे. यासाठी शनिवारी (दि. ९) संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ०२०-६६८४८५८६ या दूरध्वनी क्रमांकावर नावनोंदणी करता येईल.

राज्यातील ५ शहरांत ‘लोकमत’तर्फे आयोजित महामॅरेथॉनच्या रूपातील ‘सर्किट रन’मधील अखेरची शर्यत पुण्यनगरीत रंगणार आहे. आतापर्यंत नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर आणि नागपूर या शहरांत झालेल्या महामॅरेथॉनला लाभलेला प्रचंड प्रतिसाद पाहता, पुण्यात होणारी ‘सर्किट रन’ समारोपाची शर्यत ‘न भूतो’ ठरणार, हे निश्चित!

महामॅरेथॉनमध्ये सहभागासाठी पूर्वी ७ फेब्रुवारी ही नावनोंदणीची अंतिम मुदत होती. मात्र, नागरिकांच्या आग्रहास्तव ती ११ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. १० तसेच २१ किलोमीटरची शर्यत पूर्ण करणाºयांना मिळणारे पदक, हे या महामॅरेथॉनचे खास वैशिष्ट्य आहे. वृत्तपत्र क्षेत्रामध्ये वृत्तपत्रविक्रेत्यांचे स्थान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. वृत्तपत्र वाचकांपर्यंत पोहोचावे, यासाठी त्यांची भल्या पहाटेपासून धावपळ सुरू होते. वृत्तपत्रविके्रत्यांच्या कार्याचा सन्मान करणारे हे पदक खास पद्धतीने तयार करण्यात आले आहे.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडासंकुलापासून प्रोमो रनला प्रारंभ होईल.
प्रोमो रनपूर्वी टेनिक्नल वॉर्म अप आणि नंतर अल्पोपाहारव्यवस्था ‘लोकमत’तर्फे करण्यात आली आहे.
प्रोमो रनसाठी नोंदणी केलेल्या सर्व धावपटूंनी रविवारी पहाटे सव्वापाच वाजता शर्यतीच्या ठिकाणी हजर राहणे आवश्यक आहे. १० किलोमीटरची शर्यत सव्वासहा वाजता सुरू होईल. त्यानंतर साडेसहा वाजता ५ किलोमीटर अंतराच्या शर्यतीला प्रारंभ करण्यात येईल.

मॅरेथॉनमध्ये धावणे सोपे नाही; योग्य प्रशिक्षण, सराव अनिवार्य
मॅरेथॉनमध्ये धावणे अजिबाबतही सोपे नसते. कारण यात आपल्या शारीरिक तसेच मानसिक क्षमतेचा कस लागतो. मुळात धावणे हा शारीरिक खेळ आहे; पण यापेक्षा जास्त तो मानसिक खेळ आहे. यासाठी योग्य प्रशिक्षण आणि सराव अनिवार्य आहे. चांगली प्रशिक्षण योजना शोधावी व धावण्याचा नियोजनपूर्वक सराव करावा. योग्य प्रशिक्षण आणि सराव सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम अर्धमॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण करावी. कारण शरीराला मॅरेथॉनसाठी अनुकूल होण्यासाठी वेळ आवश्यक आहे. ते मजबूत आणि समायोजित होईल; परंतु आपल्या प्रकृती आणि क्षमतेनुसार त्याला कमी-जास्त वेळ लागणार आहे, ही गोष्ट ध्यानात ठेवावी. आपले ध्येय हे मॅरेथॉन पूर्ण धावणे, हे असले पाहिजे. म्हणूनच एक वास्तववादी लक्ष्य निर्धारित करणे आवश्यक आहे. बºयाचदा आपल्या प्रशिक्षण आणि सरावात अडथळे हे शारीरिक नसून मानसिक असतात. त्यांच्यावर मात करणे आणि आपण गरजेनुसार वेगवान किंवा दीर्घ धावू शकतो, असा विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे.
- डॉ. राजेश देशपांडे, संचालक, विश्व क्लिनिक, बाणेर.

धावताना या गोष्टी अवश्य लक्षात ठेवा...

अनेक जण धावण्याचा व्यायाम करतात. मात्र, असे धावणे आणि मॅरेथॉनमध्ये धावणे यांत मोठा फरक आहे. सामान्य अंतर धावणाºयांसाठी मॅरेथॉन पूर्ण करणे आव्हानात्मक असते. मॅरेथॉन हे शारीरिक क्षमतेच्या दृष्टीने मोठे आव्हान ठरते. कमी अंतराच्या शर्यतीत धावताना वा मॅरेथॉनमध्ये सहभागी होताना काही बेसिक गोष्टींची काळजी प्रामुख्याने घायला हवी. धावताना आपल्या पायांना आरामदायी ठरतील, अशा स्पोर्ट्स शूजची निवड करावी. अशा शर्यतीत भाग घेणाºयांनी योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक असते. शर्यतीत धावण्याच्या आदल्या दिवशी रात्री झोपताना एक ग्लास पाणी प्या. पहाटे उठल्यावर सर्वप्रथम आणखी एक ग्लास पाण्याचे सेवन करा. याशिवाय शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी सराव, त्यासाठी योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. ‘लोकमत महामॅरेथॉन’ हा उपक्रम म्हणजे, शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी आयोजित महोत्सव आहे. यात ३, ५, १० आणि २१ किलोमीटर शर्यतींचा समावेश आहे. जे प्रथमच धावण्याच्या शर्यतीत सहभागी होणार असतील, त्यांच्यासाठी १० किलोमीटर अंतरापर्यंतच्या शर्यती उपयुक्त ठरतील. आपले कुटुंबीय आणि मित्रांसोबत धावण्याचा आनंद लुटा. फिट राहा, आनंदी राहा. लोकांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी प्रभावी उपक्रम आयोजित करणाºया ‘लोकमत’ला शुभेच्छा!
- सॅली जोन्स, सहसंस्थापक
आणि प्रमुख प्रशिक्षक, मल्टिफिट वेलनेस प्रा. लि.

हेल्थ टिप्स...
जे लोक व्यायाम करीत नाहीत, त्यांच्या तुलनेत नियमित धावणाºयांची हाडे अधिक बळकट असतात. धावणे हा सोपा असला तरी परिपूर्ण व्यायाम आहे. यामुळे स्नायू आणि हाडे बळकट होण्यास मदत होते. अनेक शारीरिक व्याधी या ताण, अनिश्चितता आणि निराशेतून जन्माला येतात. या गोष्टी टाळण्यासाठी धावण्यासारखा नियमित व्यायाम हा रामबाण उपाय आहे. धावताना योग्य शूज घाला. धावण्यापूर्वी वॉर्म अप अवश्य करा. धावण्यापूर्वी थोडे चला. नंतर हळू धावा आणि मग वेग वाढवा. ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये धावणाºया सर्वांना माझ्या शुभेच्छा. आॅल द बेस्ट!
- डॉ. पराग संचेती,
चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक, संचेती हॉस्पिटल

प्रोमो रन तसेच मुख्य शर्यतीत मी ५ कि.मी. गटात धावणार आहे. दोन्ही शर्यतींसाठी एकच मार्ग असल्याने माझ्यासाठी प्रोमो रन म्हणजे मुख्य शर्यतीची रंगीत तालीम असेल. मुख्य शर्यतीत धावताना मला याचा फायदा होईल. - यश बोरा, सीए

अशी करा नावनोंदणी
प्रोमो रनसाठी नावनोंदणी मोफत असली तरी अनिवार्य आहे.
प्रोमो रनसाठी नावनोंदणी करण्यासाठी अंतिम तारीख
९ फेब्रुवारी आहे.
०२०-६६८४८५८६ या दूरध्वनी क्रमांकावर सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधून नोंदणी करता येईल.

महामॅरेथॉन : दिनांक १७ फेब्रुवारी २०१९

नावनोंदणीची अंतिम तारीख : ११ फेब्रुवारी
आॅनलाईन नोंदणीसाठी लिंक -  http://www.mahamarathon.com/pune/pune-registrations.php
आॅफलाईन नोंदणीसाठी संपर्क : 020-66848586 (सकाळी १० ते सायं. ६)

Web Title: Lokmat Mahamerathon: Promotional response to promo run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.