लोकमत आयोजित ‘पुणे प्रॉपर्टी शोेकेस २०१७’
By admin | Published: March 22, 2017 03:02 AM2017-03-22T03:02:45+5:302017-03-22T03:02:45+5:30
पुण्यातील रिअल इस्टेट मार्केटमधील बुम सुरूच असून गुंतवणुकीला चांगला परतावा देणाऱ्या मोजक्या शहरांत पुण्याचा समावेश होतो.
पुणे : पुण्यातील रिअल इस्टेट मार्केटमधील बुम सुरूच असून गुंतवणुकीला चांगला परतावा देणाऱ्या मोजक्या शहरांत पुण्याचा समावेश होतो. त्यामुळे ‘पुण्यातील घर’ हे स्वप्न साकारतानाच गुंतवणुकीची चांगली संधी म्हणून पुण्यातील गृहनिर्माण क्षेत्राला इतर शहरांतूनही पसंती मिळत आहे.
गेल्या पाच वर्षांपासून लोकमत ‘पुणे प्रॉपर्टी शोकेस’ या नावाने पुण्यातील नामांकित व प्रथितयश बांधकाम व्यावसायिकांचे प्रदर्शनाचे आयोजन औरंगाबाद, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर येथे करते. यंदाचे या उपक्रमाचे हे यशस्वी सहावे वर्ष असून येत्या शनिवारी(दि़ २५) व रविवारी (दि. २६) सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत गणेश कला, क्रीडा मंच, स्वारगेट पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे १५० हून अधिक गृहप्रकल्प यात पाहता येणार आहेत. या प्रदर्शनास बँकिंग पार्टनर बँक आॅफ महाराष्ट्र आहे.
या गृहप्रदर्शनात अॅफोर्डेबल होम्स, लक्झुरियस होम्स, व्यावसायिक प्रकल्प, रो-हाऊस, बंगलो प्लॉटस्, ओपन प्लॉटस् असे प्रॉपर्टीमधील गुंतवणुकीसाठीचे अनेक पर्याय या वेळी पुणेकरांना पाहता येणार आहेत़ पुणे, पिंपरी-चिंचवड व संपूर्ण पुणे जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली मिळणार असल्यामुळे या प्रदर्शनामध्ये वेळ व पैशाची बचत होणार आहे़ आपल्या स्वप्नातील व आपल्या गरजेप्रमाणे हवे असणारे मनपसंत घर येथे इच्छुक ग्राहकांना पाहता येणार आहेत़ या प्रदर्शनासाठी बांधकाम व्यावसायिकांनी अनेक वैशिष्ट्यपूर्ण व आकर्षक योजना आखल्या आहेत़ त्यांचाही लाभ या प्रदर्शनात भेट देणाऱ्यांना मिळणार आहे़ गेल्या ५ वर्षांमध्ये पुण्यातील अनेक इच्छुकांनी आपले पुण्यातील घर नक्की करत, हे प्रदर्शन यशस्वी केले आहे. या प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गणेश कला, क्रीडा मंचसारख्या पुण्यातील सर्व भागांतून सहजतेने पोहोचू शकणाऱ्या मध्यवर्ती ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.
आवाक्यात आलेल्या गृहकर्ज व्याजदरांमुळे आगामी काळात पुणे बांधकाम क्षेत्राचे चित्र आणखी वेगाने बदलेल, असा अंदाज व्यक्त होतो आहे. अक्षयतृतीया, गुढीपाडवा सणांच्या पार्श्वभूमीवर आताची घर खरेदीची नामी संधी आहे. (प्रतिनिधी)