लोकमत रातरागिणी: नाईट वॉकवरून सुखरूप घरी पोचवण्यासाठी रिक्षावाले भाऊ सज्ज

By राजू इनामदार | Published: December 22, 2023 12:08 PM2023-12-22T12:08:27+5:302023-12-22T12:09:47+5:30

लोकमत आयोजित रातरागिणी – निर्भय नाईट वॉक शुक्रवार, दि. २२ डिसेंबर रोजी होतो आहे...

Lokmat Ranragini: Rickshaw-pulling brothers ready to take home safely from a night walk | लोकमत रातरागिणी: नाईट वॉकवरून सुखरूप घरी पोचवण्यासाठी रिक्षावाले भाऊ सज्ज

लोकमत रातरागिणी: नाईट वॉकवरून सुखरूप घरी पोचवण्यासाठी रिक्षावाले भाऊ सज्ज

पुणे : होय, मी रातरागिणी निर्भय नाईट वॉकमध्ये मी सहभागी होणार आहे. माझ्या अनेक मैत्रिणीही सोबत येताहेत. पण रात्री उशिरा नाईट वॉक संपल्यानंतर मला घरी कोण सोडणार? याची काळजी अनेक सखींना आहे. नाईट वॉकवरून सुखरूप घरी पोचवण्यासाठी आता रिक्षावाले भाऊ सज्ज झाले आहेत. त्यामुळे सख्यांनो आता याची चिंता सोडून द्या आणि नाईट वॉकमध्ये सहभागी होऊन त्याचा मनसोक्त आनंद घ्या.

लोकमत आयोजित रातरागिणी – निर्भय नाईट वॉक शुक्रवार, दि. २२ डिसेंबर रोजी होतो आहे. या उपक्रमाला महिलांच्या विविध समूहांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. लोकमत कार्यालय, लोकमतचे प्रतिनिधी यांचे फोन दिवसभर खणाणत आहेत. लोकमत कार्यालयात दिवसभर अनेक महिला समूहाने येऊन या उपक्रमाचं स्वागत करत आहेत. या नाईट वॉकमध्ये हजारोंच्या संख्येने महिला सहभागी होणार, हे त्यातून निश्चित झालं आहे.

नाईट वॉक संपल्यावर रात्री उशिरा घरी सुखरूप कसं पोचायचं? ही चिंता काही सखींना होती. त्यावर रिक्षावाल्या भाऊंच्या सहकार्याने लोकमतने तोडगा काढला आहे. रातरागिणींना घरी सुखरूप पोचवण्यासाठी "बघतोय रिक्षावाला" ,रिक्षा पंचायत संघटना ,शिवनेरी रिक्षा संघटना, गुलटेकडी एकता प्रतिष्ठान रिक्षा संघटना, संतनगर अरणेश्वर रिक्षा संघटना आदी रिक्षा संघटनांनी पुढाकार घेतला असून अल्प दरात महिला भगिनींना घरी सुखरूप सोडवण्याचा निर्धार केला आहे. नाईट वॉक संपल्यावर शनिवारवाड्याजवळ या संघटनांच्या सुमारे ३०० रिक्षा उपलब्ध असणार आहेत.

घरी परतण्यासाठी शनिवारवाड्याजवळ रिक्षा उपलब्ध 
- रात्रीचे जादाचे भाडे न आकारता दिवसाचे भाडे आकारणार
- सुखरूप घरी पोचवण्यासाठी पोलिस, लोकमत स्वयंसेवकही सज्ज

घरी परतताना समस्या उद्भवल्यास संपर्क –
भालचंद्र - ९८८१०९८४३५   
नितीश - ८५५४८२६३३३
भाग्यश्री – ७०२८६८१७३१
अजित – ८९८३४०२०९४ 

रिक्षावाले संघटना-

बघतोय रिक्षावाला संघटना: 9960519951

शिवनेरी रिक्षा संघटना : 9689893207

गुलटेकडी एकता प्रतिष्ठान रिक्षा संघटना: 9881478859

अरणेश्वर रिक्षा संघटना : 9373687479

Web Title: Lokmat Ranragini: Rickshaw-pulling brothers ready to take home safely from a night walk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.