गप्पाटप्पांतून उलगडले नात्यांचे ‘रणांगण’ , नोबल हॉस्पिटलच्या सहयोगाने ‘लोकमत सखी मंच’चा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 03:58 AM2018-05-09T03:58:59+5:302018-05-09T03:58:59+5:30
पुणे - लोकमत सखी मंच आयोजित सहयोगी प्रायोजक नोबल हॉस्पिटल सहयोगी, रेड एफ आणि सिझन्स मॉल यांच्या सहकार्याने ‘गप्पाटप्पा रणांगण चित्रपटाच्या कलाकारांसोबत’ हा कार्यक्रम सिझन्स मॉल, हडपसर येथे सखींच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी ख्यातनाम कलाकार नृत्याचे महागुरू सचिन पिळगावकर, चॉकलेट बॉय स्वप्निल जोशी, प्रणाली घोगरे व दिग्दर्शक राकेश सारंग हे उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये ‘सख्या रे घायाळ मी हरिणी’ या प्रसिद्ध गीताचे रसिक प्रेक्षकांसमोर नव्याने सादरीकरण फेसबुक लाईव्हने करण्यात आले.
या वेळी स्वप्निल जोशी म्हणाला, ‘आयुष्यातील सर्वांत मोठी युद्धे ही स्वयंंपाक घरात सुरू होतात. ज्याला स्वयंपाक घरातील युद्ध जिंकता आले त्याने घर जिंकले आणि ज्याने घर जिंकले त्याने आयुष्य जिंकले. आमच्या चित्रपटातील रणांगण देखील असेच आहे. ते फक्त स्वयंपाक घरात सुरू न होता चार भिंतीच्या आत सुरू होते. आपण बाहेरच्या माणसांशी कितीही वाद घालू शकतो-लढू शकतो, पण जेव्हा आपल्या समोर आपलीच माणसं उभे असतात
तेव्हा, त्यासारखे दुसरे मोेठे दु:ख
नाही. आणि ही व्यथा एक स्त्रीच समजू शकते. आपल्या माणसांचे सतत चांगले करत राहणे,
सतत आपल्या माणसांकडून अपमान सहन करूनदेखील आपल्या माणसांच्या सुखासाठी प्रयत्न
करत राहणे हे जितके स्त्रीला
जमते ते एका पुरुषाला कधीही जमणार नाही.’
सचिन पिळगावकर म्हणाले, ‘बदल सिनेमा सृष्टीतील असो अथवा अन्य, कोणत्याही परिस्थितीला असो, बदल ही कधीही न थांबणारी गोष्ट आहे. मी ब्लॅक अॅण्ड व्हाईटने चित्रपटात काम करण्याला सुरुवात केलीे. आणि त्यातून रंगीत चित्रपट सृष्टीकडे जाताना होणारे बदल मी स्वत: अनुभवलेले आहेत. त्याच बरोबर मराठी सिनेसृष्टीत अनेक बदल घडत गेले. प्रेक्षकांचा अवेअरनेस वाढत गेला. त्यामुळे आम्हाला अजून शिकायला लागले. प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्हाला अनेक गोष्टी आत्मसात करायला लागल्या. यामध्ये एकमेव गोष्ट आहे, की जी बदलली नाही, ती म्हणजे भारतीय लोकांच्या भावना होय. लोकमत सखी मंच तर्फे आयोजित या कार्यक्रमात सखी मंचच्या महिलांनी इतक्या मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी सख्यांचे आणि ‘लोकमत’चे भरपूर मनापासून आभारी आहे. ’
याप्रसंगी उपस्थितांना कलाकारांच्या हस्ते प्रश्नमंजूषा स्पर्धेचे विशेष पारितोषिक विजेत्या नीलम वाघ, रेखा होनकांडे, सुनीता बागडे यांना देण्यात आले.
या वेळी
सखी मंचच्या महिलांसाठी ‘१ मिनिट गेम शो’ रिंग (पास द रिंग), जम्प इन जम्प आउट हे मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले.