‘लोकमत सरपंच अॅवॉर्ड’च्या प्रवेशिकांची तज्ज्ञांकडून छाननी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 01:46 AM2019-03-08T01:46:37+5:302019-03-08T01:46:52+5:30
गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही ‘लोकमत सरपंच अॅवॉर्ड’च्या दुसऱ्या पर्वाला जिल्ह्यातून उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
पुणे : गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही ‘लोकमत सरपंच अॅवॉर्ड’च्या दुसऱ्या पर्वाला जिल्ह्यातून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. १३ क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींनी पुरस्कारासाठी याही वर्षी मोठ्या प्रमाणात प्रस्ताव दाखल केले आहे. तज्ज्ञ परीक्षकांकडून या प्रस्तावांची तपासणी सुरू
असून, येत्या सोमवारी (दि.११) विजेत्या स्पर्धकांची नावे घोषित करण्यात येणार आहेत. गावखेड्याच्या बदलाची नोंद घेण्यासाठी गावच्या कारभाऱ्यांना ‘लोकमत सरपंच अॅवॉर्ड’ हा बीकेटी टायर्स प्रस्तुत व पतंजली आयुर्वेद प्रायोजित ‘लोकमत सरपंच अॅवॉर्ड्स’ने गौरविण्याचा निर्णय ‘लोकमत’ने गेल्या वर्षी घेतला. गावाच्या विकासासाठी झटणाºया सरपंचांना वैयक्तिक पातळीवर गौरविणारा हा पहिलाच पुरस्कार आहे. याही वर्षी सरपंचांनी विविध १३ क्षेत्रांत केलेल्या कामांची पाहणी करून या प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया ग्रामपंचायती आणि सरपंचाची निवड करण्यात येणार आहे. ‘लोकमत’च्या या उपक्रमाला याही वर्षी विविध गावच्या सरपंचांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रस्ताव पाठवले.
या सर्व प्रस्तावांची तज्ज्ञ परीक्षकांकडून छाननी करण्यात आली आहे. नॅशनल फेडरेशन फॉर अर्बन बँक्स अँड के्रडिट सोसायटीचे उपाध्यक्ष विद्याधर अनास्कर आणि राज्याचे माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट या तज्ज्ञांनी सर्व अर्जाची बारकाईने पाहणी केली. काही सरपंचाशी थेट संपर्क साधून त्यांनी प्रश्नही विचारले.
याद्वारे त्यांनी १३ क्षेत्रांतून विविध सरपंचाची या पुरस्कारासाठी निवड केली असून, येत्या सोमवारी (दि. ११)
येरवडा येथील गुंजन टॉकीजशेजारी असणाºया अण्णा भाऊ साठे
या सभागृहात होणाºया
कार्यक्रमात भाग्यवान विजेत्यांची नावे मान्यवरांच्या हस्ते जाहीर करण्यात येणार आहेत.
पुरस्काराच्या कॅटेगरी आणि निकष
जल व्यवस्थापन, वीज व्यवस्थापन, शैक्षणिक सुविधा, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरणसंवर्धन, प्रशासन /ई-प्रशासन/ लोकसहभाग, रोजगारनिर्मिती, कृषी तंत्रज्ञान, उदयोन्मुख नेतृत्व, सरपंच आॅफ द इयर या १३ क्षेत्रांत हे पुरस्कार दिले जाणार आहेत. या प्रत्येक क्षेत्रात सरपंचांनी केलेले काम पाहून त्या-त्या क्षेत्रातील विजेते निवडले जाणार आहेत.
>पुरस्कार प्रदान सोहळा
सोमवार दि. ११ मार्च २0१९ रोजी सायंकाळी ४ वाजता लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, येरवडा, गुंजन थिएटरजवळ होणार आहे. अधिक माहितीसाठी गणेश गंगाळे यांच्याशी सकाळी १० ते सायंकाळी ६.३० पर्यंत संपर्क साधावा. ८८८८७५८६७६
>गावांमधील कृषी, जल, स्वच्छता, आरोग्य या क्षेत्रांत काम करणे आव्हानात्मक असते. म्हणूनच त्याची दखल घेऊन आदर्श सरपंचांना गौरविणे हे महत्त्वाचे आहे.
- उमाकांत दांगट,
माजी कृषी आयुक्त